24 तासात 3500 पेक्षा जास्त नवे रुग्ण, देशात कोरोना रुग्णांनी ओलांडला 50 हजारांचा आकडा

0
368

नवी दिल्ली | भारतात कोरोना रूग्णांची संख्या 50 हजारांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केलेल्या ताज्या माहितीनुसार देशात कोरोनाची एकूण पॉझिटिव्ह प्रकरणे आता 52 हजार 952 झाले आहेत. यापैकी 1783 लोक मरण पावले आहेत, तर 15 हजार 267 लोक बरे झाले आहेत. देशात 35 हजार 902 सक्रिय प्रकरणे आहेत.

गेल्या 24 तासांत देशात 3500 नवीन कोरोना रुग्ण समोर आले आहे. तर जवळपास 90 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या तीन दिवसांत, संसर्गाचे प्रमाण सर्वात वेगवान आहे. 4 मे रोजी देशात 41 हजार लोक संक्रमित झाले होते, 7 मे पर्यंत ही संख्या सुमारे 53 हजारांवर पोहोचली आहे. दररोज सरासरी 3500 नवीन प्रकरणे समोर येत आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

कोरोनाचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात झाला आहे. आतापर्यंत येथे 16 हजार 758 प्रकरणे नोंदविण्यात आली असून त्यामध्ये 651 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 3094 लोक बरे झाले आहेत. महाराष्ट्रानंतर गुजरातमध्ये संसर्ग झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत 6 हजार 625 प्रकरणे नोंदली गेली आहेत. ज्यात 396 लोकांचा मृत्यू झाला आहे.

?????????????????????????????????????????????????????????

तर दिल्लीत कोरोना रूग्णांची संख्या 5500 पेक्षा जास्त झाली आहे. आतापर्यंत 5532 प्रकरणे झाली आहेत. ज्यात 65 लोकांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडू चौथ्या क्रमांकावर आला आहे. आतापर्यंत 4829 घटनांची पुष्टी झाली असून त्यामध्ये 35 लोकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर राजस्थानमध्ये 3317 कंफर्म झाल्याची नोंद झाली आहे. त्यामध्ये 92 लोकांचा मृत्यू झाला आहे.

त्याचबरोबर मध्य प्रदेशात आतापर्यंत 3138 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ज्यामध्ये 185 लोक मरण पावले आहेत. उत्तर प्रदेशातही कोरोना रूग्णांची संख्या वाढली आहे. आता रूग्णांची संख्या 2998 झाली आहे. यामध्ये 60 लोकांचा बळी गेला आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur