ग्लोबल न्यूज: सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 2644 इतकी झाली आहे. तर मृतांची एकूण संख्या 267 झाली आहे. शहर जिल्ह्यात मिळून सध्या 973 जणांवर उपचार सुरू आहेत तर आत्तापर्यंत 1404 जण कोरोना मुक्त झाले आहेत.

सोलापूर शहरात आज 88 अहवाल प्राप्त झाले यात 70 निगेटीव्ह तर 18 पॉझिटिव्ह अहवाल आहेत. यामध्ये 11 पुरुष आणि 7 महिलांचा समावेश आहे. आज बरे होऊन घरी परतलेल्या यांची संख्या 39 आहे. तर आज मृतांची संख्या 3 आहे.
सोलापूर ग्रामीणमध्ये आज 129 अहवाल प्राप्त झाले. यात 112 निगेटिव्ह तर 17 पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 14 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे .आज ग्रामीणमध्ये 12 रुग्ण बरे झाले तर मृत एकही नाही.

सोलापूर ग्रामीण मध्ये आतापर्यंत एकूण 361 पॉझिटिव्ह रुग्ण मिळून आले तर 17 मृतांची संख्या झाली आहे. आत्तापर्यंत 142 जण कोरोना मुक्त झाले आहेत तर सध्या 202 जणांवर उपचार सुरू आहेत.

उद्या आषाढी एकादशी निमित्तानं श्री क्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा पहाटे 2 .20 ते 3:30 या कालावधित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सपत्नीक होणार आहे.

दरम्यान विविध ठिकाणाहून संतांच्या पालख्या एसटीच्या ताफ्यातून पंढरपुराकडे येत आहेत.
कोरोना पार्श्वभूमीवर यंदा अनेक वर्षात प्रथमच पंढरपूरला पायी वारी आणि पालखी सोहळा झालेला नाही.
पंढरपुरात आजपासूनच तीन दिवसासाठी संचार बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.कोरोना महामारी पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात येथे 31 जुलै पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी लागू केले आहेत.
