राज्याच्या अर्थसंकल्पात बार्शीतालुक्यासाठी 166 कोटी निधी मंजूर – आमदार राऊत
बार्शी- बार्शी उपसा सिंचन योजनेसाठी ८० कोटी, ग्रामीण भागातील रस्ते कामासाठी ७५ कोटी ४७ लाख,बार्शी ते तुळजापूर रस्त्याचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे यासाठी 57 लाख,न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश ३ व दिवाणी न्यायाधीश(SD) २,दिवाणी न्यायाधीश २ (JD) यांच्या निवासस्थान बांधकामांसाठी ५ कोटी ५५ लाख,प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत तालुक्यातील २४ गावातील तीर्थक्षेत्राचा पर्यटन विकास करण्यासाठी ४ कोटी ८१ लाख रुपये मंजूर करण्यात आल्याचे आमदार राजेद्र राऊत यांनी सांगितले.

बार्शी तालुक्यासाठी 2023- 24 अर्थसंकल्पात मंजूर झालेला निधी व तरतूद केलेल्या रस्त्यांची नावे व निधी पुढील प्रमाणे-
१) बार्शी तुळजापूर रोड कि.मी. २२/६०० ते २५/०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी ९० लाख
२) मोहोळ वैराग रोड कि.मी. २२०/०० ते २२१/४०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी
३) भूम वारदवाडी ते शेंद्री रोड किमी १६९ / ३०० ते १७१/८०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी ४० लाख
४) भूम वारदवाडी शेंद्री रोड किमी १७१/८०० ते १७४ / ३०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी ९० लाख
५) अंजनगाव श्रीपत पिंपरी,कोरफळे,पानगाव साकत पिंपरी ते किमी २६/०० ते २९/०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी ५० लाख
६) बार्शी ते आरणगाव,धोत्रे,पिंपळगाव ते घारी रोड किमी ९०० ते १४०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी
७) अंजनगाव,श्रीपत पिंपरी, कोरफळे,पानगाव साकत पिंपरी किमी २२/०० ते २६/०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी ६५ लाख
८) आगळगाव,उंबरगे,भानसळे,खडकोणी, कोरेगाव रोड किमी १०/०० ते १३/८०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी ६५ लाख
९) देवगाव,पिंपळगाव,खडकलगाव,आगळगाव,कुसळंब,खामगाव,तांदुळवाडी,बावी,पानगाव,रस्तापूर,सुर्डी,यावली,तडवळे,मुंगशी ते कोथळी रोड किमी २७/०० ते ३४/०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी ९० लाख
१०)अंजनगाव,श्रीपतपिंपरी,कोरफळे,पानगाव, साकत पिंपरी किमी ९/०० ते १०/७०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी
११) बार्शी,गाडेगाव रोड किमी ०/०० ते ४/०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी ५० लाख
१२) बार्शी,मालवंडी,मानेगाव,नरखेड रोड किमी १४/०० ते १८०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी ९० लाख
१३) बार्शी,आरणगाव,धोत्रे,पिंपळगाव ते घारी रोड किमी ५/८०० ते ९०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी ९० लाख.
१४) गोरमाळे,नारी,इंदापूर,उपळे दुमाला, मुंगशी(आर),रातंजन, हिंगणी(आर), धामणगाव(दु),शेलगाव (आर) ते कौठाळी रोड किमी २१/६०० ते २५/९०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी

१५) रातंजन,हत्तीज,सारोळे रोड किमी ०/०० ते ४/५०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी
१६) वैराग,हिंगणी,मालेगाव,चिखर्डे,गोरमाळे,पांगरी, उक्कडगाव जिल्हा हद्द किमी १८/०० ते १९/०० आणि किमी २५/०० ते २७/०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी ९० लाख
१७) काटेगाव,चारे,पाथरी,पांगरी,कारी रोड किमी ०/०० ते ३/४०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी
१८) देवगाव,पिंपळगाव,खडकलगाव,आगळगाव,कुसळंब,खामगाव,तांदुळवाडी,बावी,पानगाव,रस्तापूर,सुर्डी,यावली,तडवळे,मुंगशी ते कोथळी रोड किमी ३/०० ते ६/०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी ९० लाख
१९) अंजनगाव,श्रीपत पिंपरी,कोरफळे, पानगाव, साकत पिंपरी किमी ६/८०० ते ९/०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी ५० लाख
२०)देवगाव,पिंपळगाव,खडकलगाव,आगळगाव,कुसळंब,खामगाव,तांदुळवाडी,बावी,पानगाव,रस्तापूर,सुर्डी,यावली,तडवळे,मुंगशी ते कोथळी किमी ६/०० ते ९/०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी ५० लाख
२१) बार्शी,उपळाई ठोंगे किमी ०/०० ते ५/५०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी
२२) बाभुळगाव,धानोरे रोड किमी ०/०० ते ३/०० मध्ये सुधारणा करणे यासाठी १ कोटी २५ लाख
२३) धानोरे,पुरी रोड किमी ०/०० ते ३/०० मध्ये सुधारणा करणे यासाठी १ कोटी २५ लाख
२४) वैराग,लाडोळे,हळदूगे,उपळे दुमाला रोड किमी ०/०० ते ९०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी ९० लाख
२५) राज्य मार्ग २०६ ते रऊळगाव रस्ता किमी ०/०० ते ४/०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी
२६) हळदुगे,नांदणी रोड किमी ०/०० ते ४/०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी,
२७) खामगाव ते पिंपळगाव ते पुरी रस्ता किमी ०/०० ते ७/०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी ५० लाख
२८) आगळगाव ते देवळाली रोड किमी ०/०० ते ५/०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी,
२९) शेलगाव ते खडकलगाव जिल्हा सीमा किमी ०/०० ते ६/०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी
३०) उंडेगाव ते इर्ले रोड किमी ०/०० ते २/५०० मध्ये सुधारणा करणे यासाठी ३ कोटी २५ लाख,
३१) उंडेगाव ते पानगाव रस्ता किमी ०/०० ते ५/०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी २५ लाख
३२) सासुरे ते कौठाळी रोड किमी ०/०० ते २/५०० मध्ये सुधारणा करणे यासाठी १ कोटी ५० लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत.
सदरील कामासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे राजेंद्र राऊत यांनी बार्शी तालुक्याच्यावतीने जाहीर आभार मानले.