मुबंईत १६००० हजार विनाकारण फिरणारी वाहने जप्त
कोरोनाच्या वाढत्या संकटात राज्यात ३१ जुलै पर्यंत लॉकडाऊन आहे त्या स्थितीत ठेवण्यात आलेला आहे. तसेच कोरोनाच्या वाढत्या साखळीला आळा घालण्यासाठी जनतेने विनाकारण घराबाहेर न फिरण्याचे अवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.

तसेच २ किमी परिसराच्या आता खरेदी करण्याची मुभा सुद्धा नागरिकांना देण्याय आली होती. तरीही काल मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर फिरताना दिसत होती. या वाहनांवर पोलिसांतर्फे कारवाही करण्यात आलेली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत नाकाबंदी करण्याचे आदेश दिले होते. मुंबईकर रस्त्यावर वाहने घेऊन बाहेर पडत असल्याने गर्दी वाढत असल्याचं दिसून आल्यानंतर हे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी मुंबईत ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती.
कारणांशिवाय वाहने घेऊन घराबाहेर पडणाऱ्यांना पोलिसांनी अद्दल घडवत त्यांची वाहने जप्त केली होती. रविवारी साडे सात हजार वाहने जप्त केल्यानंतर कालही कारवाई सुरू ठेवत १६ हजार वाहने जप्त करण्यात आली.