सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज सोमवारी दुपारी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री 12 पर्यंत एकूण 3047 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी 2906 अहवाल निगेटिव्ह आले असून 144 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात 67 पुरुष तर 77 महिलांचा समावेश होतो .आज 258 प्रलंबित तपासणी अहवाल असल्याची माहिती सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

18 बाधित व्यक्ती बऱ्या होऊन घरी गेल्या आहेत.यामध्ये 10 पुरुष तर 8 8 महिलांचा समावेश आहे. 3 व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. अशी माहिती सोलापूर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.
तिघांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये सिध्देश्वर पेठेतील 72 वर्षीय पुरुष, रेल्वे लाईन परिसरातील 82 वर्षीय तर मेरगू टॉवरजवळील सूत मिल परिसरातील 50 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

या भागात आढळले रुग्ण

वर्धमान नगर, रत्नमंजिरी सोसायटी, शिवगंगा नगर, सुभाष नगर, मंगल विहार अर्पाटमेंट (जुळे सोलापूर), भवानी पेठ, महापालिका कॉलनी (सात रस्ता), मोदी खाना, लोधी गल्ली, लक्ष्मी मंदिराजवळ, मजरेवाडी (मजरेवाडी), संतोष नगर, शिवाजी नगर (बाळे), काडादी चाळ, मेरगू टॉवर, पापराम नगर, संजय गांधी नगर (विजयपूर रोड), थोबडे वस्ती (जुना देगाव नाका), विडी घरकूल (हैदराबाद रोड), शिवगंगा नगर (पारशी विहिरीमागे),
मुरारजी पेठ, एन.जी. मिल चाळ, कुमठे तांडा, लक्ष्मी नगर (हत्तुरे नगर), सत्तर फूट रोड, रेवणसिध्देश्वर नगर, बुधवार पेठ, वसंत विहार व राधाकृष्ण कॉलनी, गवळी वस्ती (दमाणी नगर), कमल शेरी अपार्टमेंट (बुधवार पेठ), नागनाथ सोसायटी (एमआयडीसी), ऋषि नगर, थोबडे वस्ती (लक्ष्मी पेठ), इंदिरा झोपडपट्टी, सिध्देश्वर पेठ, नंदीकेश नगर (शेळगी), दत्त मंदिराजवळ (देगाव), पश्चिम मंगळवार पेठ, दक्षिण सदर बझार,

हुच्चेश्वर नगर, तिरुपती कॉर्नर (मोदी), शोभा नगर, मंजुषा हौसिंग सोसायटी, राजस्व नगर, इंद्रधनु सोसायटी, अमृता नगर, इंदिरा नगर, विष्णू नगर (नई जिंदगी), लतादेवी नगर (कुमठा नाका), राम शेट्टी नगर, स्टेट बॅंक कॉलनी, विद्या नगर, शिंदे चौक, न्यू पाच्छा पेठ, बागवान नगर, राघवेंद्र नगर, केकडे नगर, कोटा नगर (जुना विडी घरकूल), माशाळ वस्ती (जुना पुना नाका), योगीराज महादेवी नगर, हरळय्या नगर (होटगी रोड), मड्डी वस्ती (कुमठे),
शंकर नगर, आसरा हौसिंग सोसायटी, स्वामी विवेकानंद नगर (हत्तुरे वस्ती), रोहिदास नगर, अवंती नगर, थोबडे नगर, निलकंठेश्वर मंदिराजवळ याठिकाणी रविवारी (ता. 26) नवे रुग्ण आढळले आहेत. त्याचा अहवाल महापालिकेने आज (सोमवारी) दिला.