सोलापूर शहरात आज ही 102 आणि दोन मृत्यू ; वाचा सविस्तर-

0
358

सोलापूर शहरात आज ही 102 आणि दोन मृत्यू ; वाचा सविस्तर-

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज शुक्रवारी 342 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी 240 अहवाल निगेटिव्ह आले असून 102 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.यात 65 पुरुष तर 37 महिलांचा समावेश होतो .आज एकही प्रलंबित अहवाल नसल्याची माहिती सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.आज फक्त 3 बाधित व्यक्ती बऱ्या होऊन घरी गेल्या आहेत.आज 2 व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.

शहरात एकूण 4499 पॉझिटिव्ह रुग्ण आजवर मिळून आले आहेत. आत्तापर्यंत 263 व्यक्ती कोरोनामुळे मृत पावल्या आहेत. शहरात 852 जणांवर कोरोना वर उपचार घेत आहेत.आत्तापर्यंत 1384 जण कोरोना मुक्त झाले आहेत.

मयत झालेल्या व्यक्तींची माहिती-


१. मयत झालेली व्यक्ती दत्तनगर, जुळे सोलापूर परिसरातील असून, ८७ वर्षाचे पुरुष असून,
दि.२०/०६/२०२० रोजी दुपारी ०१.३१ वाजता अश्विनी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झाले होते.
उपचारा दरम्यान दि.०३०७/२०२० पहाटे ०२.४५ वाजता रोजी त्यांचे निधन झाले. त्यांचे कोव्हिङ-१९
अहवाल प्राप्त असून, तो पॉझिटिव्ह आहे.


२. मयत झालेली व्यक्ती अत्तारनगर, विजापूर रोड परिसरातील असून, ७० वर्षाचे महिला असून,
दि.२३/०६/२०२० रोजी दुपारी १२.२६ वाजता अश्विनी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झाले होते.
उपचारा दरम्यान दि.०२/०७/२०२० रोजी रात्री ०८.२० वाजता त्यांचे निधन झाले. त्यांचे कोद्हिड-१९
अहवाल प्राप्त असून, तो पॉझिटिव्ह आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here