100 ते 1 लाख, ‘असा’ वाढला कोरोना; देशातील गेल्या 15 दिवसातील आकडे भीतीदायक

0
389

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू आहे. चौथ्या टप्प्यात अधिक सवलती मिळाल्या आहेत. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येताना दिसत आहे. एकीकडे लॉकडाऊनमध्ये सवलती देण्यात आल्या असल्या तरी दुसरीकडे कोरोनानेही वेग पकडला आहे.

गेल्या 24 तासात देशात विक्रमी 6088 रूग्णांची नोंद झाली ,तर 148 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील रुग्ण संख्या 1 लाख 18 हजार 447 झाली, तर मृतांचा आकडा 3 हजार 583 वर पोहोचला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 48 हजार 534 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून 66 हजार 330 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

देशात गेल्या 15 दिवसात कोरोना वाढीचा वेग वाढल्याचे दिसून आले आहे. फक्त 15 दिवसात 56 हजारपेक्षा जास्त रूग्णांची नोंद झाली आहे. 8 मे रोजी देशातील रुग्ण संख्या 56 हजार 342 होती आणि आज बरोबर 15 दिवसांनी जवळपास दुप्पट झाली आहे. हा वेग भीतीदायक म्हणावा लागेल. मात्र या सोबत रुग्ण बरे होण्याची टक्केवारीही वाढत आहे.

‘असा’ वाढला कोरोना
– हिंदुस्थानमध्ये 30 जानेवारी रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता.
– 29 मार्चपर्यंत देशातील कोरोना बाधितांची संख्या 1 हजार पर्यंत पोहोचली.
– 13 एप्रिलला हाच आकडा 10 हजार झाला.
– 6 मे पर्यंत कोरोना रुग्णांचा आकडा 50 हजार पार गेला.
– 18 मे रोजी देशातील रुग्ण संख्या 1 लाख 18 हजार झाली.

जगभरातील अन्य देशांचा विचार करता सध्या कोरोना बाधितांच्या संख्येत हिंदुस्थानचा नंबर अकरावा आहे. देशातील रुग्ण संख्या 100 ते 1 लाखांपेक्षा जास्त होण्यास अवघा 64 दिवसांचा कालावधी लागला. अमेरिका आणि स्पेनशी तुलना केल्यास निम्म्या कालावधीत आपण हा आकडा गाठला आहे. असे असले तरी इतर देशांच्या तुलनेत सरासरी रुग्ण आणि मृत्यू याबाबत हिंदुस्थान सरस आहे. देशातील मृत्युदर 3.06 टक्के आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur