५० बड्या कर्जबुडव्यांचे कर्ज माफ प्रकरण: रोहित पवार यांनी साधला रिझर्व्ह बँकेवर निशाणा…म्हणाले

0
293

भारतीय रिझर्व्ह बँकेने ५० बड्या कर्जबुडव्यांचे जवळपास ६८ हजार ६०७ कोटी रुपये कर्ज माफ केल्याचं धक्कादायक माहिती उघड झाली आहे.याप्रकरणी महाराष्ट्रातील कर्जत-जामखेड चे राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी उडी घेत RBI वर निशाणा  साधला आहे . याबाबत त्यांनी ट्विट केल आहे .

‘प्रामाणिक कर्जफेड करणारे मध्यम, लघु व्यावसायिक व उद्योजक,गृह व वाहन कर्जधारक यांच्या मदतीसाठी सरकारशी नेहमीच झगडावं लागतं. पण अनेक बँकांना गंडा घालणाऱ्यांचं तब्बल 68 हजार कोटी ₹ चं कर्ज मात्र RBI सहजपणे राइट ऑफ करते. ही बातमी वाचून मन सुन्न झालं.’ असे रोहित पवार यांनी म्हंटले आहे. 

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

RBI ने ५० बड्या कर्जबुडव्यांचे (‘विलफुल डिफॉल्टर’चे) ६८ हजार ६०७ कोटींची कर्जे राइट ऑफ खात्यात टाकल्याची कबुली दिली आहे. ज्या व्यक्तींच्या/कंपन्यांच्या कर्जावर बँकेने पाणी सोडलं आहे त्या कर्जबुडव्यांमध्ये PNB गैरव्यवहार प्रकरणी फरार असलेल्या मेहुल चोक्सीचाही समावेश असल्याचे RBI ने महिती अधिकाराअंतर्गत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं आहे.
यात पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी मेहूल चोकसीचं नावही समाविष्ट आहे. माहिती अधिकाराखाली मागवलेल्या माहितीतून हे सत्य समोर आलं आहे. आरटीआय कार्यकर्ते साकेत गोखले यांनी ५० मोठे कर्जबुडवे आणि त्यांची १६ फेब्रुवारीपर्यंत कर्जाची स्थिती काय आहे? याची माहिती मागवली होती.

माहिती अधिकार कार्यकर्ता साकेत गोखले यांनी यासाठी ही माहिती मागवली होती कारण राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये १६ फेब्रुवारी २०२० रोजी लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सितारमन आणि अर्थ खात्याचे राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांना यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावेळी या दोघांनीही उत्तर दिले नव्हते. म्हणूनच मी आरटीआय अंतर्गत हा अर्ज केल्याचं त्यांनी सांगितले.

जे सत्य केंद्र सरकारने लपवलं त्याची माहिती आरबीआयचे केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकारी अभय कुमार यांनी २४ एप्रिलच्या उत्तरामध्ये दिली आहे. ज्यात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur