बार्शीचे कॅन्सर हॉस्पिटल अबाधित रहावे यासाठी मुंबईच्या टाटा कॅन्सर हॉस्पिटलला वर्ग करावे, अशी होती डॉ. नेनेंची अंतिम इच्छा
मृत्यूच्या अगोदर संचालक मंडळाकडे पत्राद्वारे केली होती विनंती
बार्शी: येथील नर्गिस दत्त कॅन्सर हॉस्पिटलचे संस्थापक चेअरमन डॉ. बी.एम. नेने यांच्या निधनानंतर मागील महिन्यात त्यांनी संचालक मंडळाला लिहिलेले चार पानी पत्र समोर आले असून त्यामध्ये त्यांनी हे हॉस्पिटल माझ्यानंतरही नावारुपाला यावे व ते अखंडितपणे सुरु रहावे, अशी माझी अंतिम इच्छा आहे. यासाठी चालू स्थितीतील हे नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल हे मुंबईच्या टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलला वर्ग करावे, अशी मनोमन इच्छा व्यक्त केली होती व या बाबतीतील आपला निर्णय ७ जानेवारीपर्यंत कळवावा, असे म्हटले होते व त्याच कालावधीत ते आजारी पडले व त्यांचे निधन झाले. त्यामुळे संचालक मंडळ त्यांच्या अंतिम इच्छेचा आदर करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
डॉ. बी.एम. नेने यांनी या पत्रात म्हटले आहे की, १९७२ ला खूप मोठ्या हॉस्पिटलची संधी होती. इंग्लंडमध्ये काम करुन आज मी कोट्याधीश झालो असतो. पण आईवडिलांच्या इच्छेनुसार •ाारतात आलो. हिरेमठ हॉस्पिटलमध्ये तुटपुंज्या पगारावर कामाला सुरुवात केली. पगार कमी असल्यामुळे स्वत:चे खाजगी क्लिनिक सुरु केले. त्या काळात कै. बाबुराव कथले व कै. सर्वमंगला कथले यांची सेवा करण्याची संधी मिळाली. त्यांनी मला वैयक्तीक ७ एकर जागा देवू केली. मात्र ती मला न घेता पूर्ण विचारांती माझे मित्र कै. दादासाहेब गाडेकर, श्रीधरराव पाटील, सूर्यकांत •ााई देसाई, अहिरे काका यांच्याशी चर्चा करुन कॅन्सर हॉस्पिटल काढण्याची कल्पना सुचविली. विचारांती निर्णय घेवून कॅन्सर हॉस्पिटल उ•ाारण्याचे ठरले.
त्याकामी माझ्या पत्नीचीही साथ ला•ाली. बार्शीतील शाळेचे विद्यार्थी, हमाल, शिक्षक, प्राध्यापक, एस.टी. कर्मचारी व बाहेरच्या लोकांनीही मदत केली. मान-अपमान सहन केले. याशिवाय सुनिल दत्त, दीपचंद गार्दी, रतन टाटा, बिल गेटस्, अ•ाय फिरोदिया यांनी मोठी आर्थिक मदत केली. डॉ. प्रफुल्ल देसाई यांनी तर खूप साथ दिली.
अथक प्रयत्नानंतर हॉस्पिटल सुरु झाले. याचा बार्शीकरांना आनंद झाला. १९८१ सालापासून मी चेअरमनपदावर कार्यरत आहे. एकही दिवस न चुकता मी हॉस्पिटलचे कामकाज आजतागायत पहात आहे. माझ्यानंतर हे हॉस्पिटल अबाधित राहावे, नावारुपाला यावे, अशी माझी अंतिम इच्छा आहे. त्यासाठी चालू स्थितीतील हे हॉस्पिटल टाटा मेमोरियल हॉस्पिटलला वर्ग करावे, अशी माझी मनोमन इच्छा आहे.
हॉस्पिटल का वर्ग करावे याची कारणे त्यांनी या पत्रात दिली आहेत. टाटा हॉस्पिटलमार्फत या ठिकाणी तज्ञ डॉक्टरांची उपलब्धता होईल. मुंबईला उपचारासाठी जाणारे सर्व पेशंट बार्शीत उपचार घेवू शकतील. नवीन आधुनिक तपासणीच्या मशीन या हॉस्पिटलला मिळतील.

आता आपल्याकडे आधुनिक मशीन्स उपलब्ध नाहीत. टाटा हॉस्पिटलमुळे नवीन प्रकल्प मिळतील. त्यासाठी निधी उपलब्ध होईल याचा ग्रामीण •ाागातील लोकांना मोठा फायदा होईल. सध्या कॅन्सर रुग्ण आजार शेवटच्या पायरीला असताना येतो. वरील प्रकल्पांमुळे कॅन्सरविषयी जनजागृती होईल व रुग्ण लवकर उपचारासाठी येतील. त्यामुळे त्यांचे आयुष्य वाढेल. किंबहुना प्राणही वाचतील. हॉस्पिटलमधील कर्मचारी अनु•ावी आहेत. मात्र ते अल्प पगारात काम करीत आहेत. त्यांच्या पगारीत वाढ होवून कर्मचारी आनंदात काम करतील.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे रुग्णांना मुंबईमध्ये मिळणाºया सर्व आधुनिक सुविधा ज्या सध्या आपण येथे देवू शकत नाही त्या सुविधा गरजू रुग्णांना बार्शीसारख्या शहरात मिळण्याची सोय होईल आणि नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल राज्यातील ग्रामीण •ाागातील नंबर १ चे हॉस्पिटल होईल. चांगल्या तज्ञ डॉक्टरांचा संच टाटा हॉस्पिटलमार्फत बार्शीच्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये कार्यरत होईल. त्याचा रुग्णांना फायदा होईल व हॉस्पिटलची आर्थिक घडी वाढेल.
शेवटी काय, हे आपण आतापर्यंत रुग्णांच्या सेवेसाठीच प्रपंच करीत आहोत. आपणा सर्वांना माहितच आहे की, २ वर्षांचा आढावा पाहिला असता साधारणपणे ५० टे रुग्ण कमी झालेले आहेत. •ाविष्यात हॉस्पिटल चांगल्या प्रकारे नावारुपाला यावे यासाठी हे हॉस्पिटल टाटा मेमोरियल मुंबई यांच्याकडे वर्ग करावे ही माझी अंतिम व मनोमन इच्छा आहे. त्याचा आपण आदर करावा.
१९८० साली कॅन्सर हॉस्पिटलचे रोपटे लावले. ते आता वटवृक्ष झालेच आहे. हा वटवृक्ष अबाधित राखण्यासाठी आपण सर्वांनी माझ्या इच्छेचा जरुर विचार करावा व आतापर्यंत आपण मला साथ दिली, पुढेही अशीच साथ द्याल, अशी अपेक्षा आहे. आपला निर्णय ७ जानेवारी २०२० पर्यंत कळवावा ही नम्र विनंती.
आपला,
डॉ. बी.एम. नेने,
चेअरमन, नर्गिस दत्त मेमोरियल हॉस्पिटल, बार्शी.
हे पत्र सर्व संचालक मंडळ, कार्याध्यक्ष व अध्यक्ष यांना पाठविले असून यावर आता संचालक मंडळ काय निर्णय घेणार याकडे बार्शीकरांचे लक्ष लागले आहे.