हा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय – डोनाल्ड ट्रम्प

0
283

हा काही फ्ल्यू नाही. हा तर अमेरिकेवर झालेला हल्ला आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. व्हाईट हाऊसमध्ये नैमित्तिक पत्रकार परिषदेत त्यांनी आपली
ही भूमिका मांडली. 

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, आमच्यावर हल्ला झालाय. हा काही फ्ल्यू नाही. आतापर्यंत कोणीच भूतकाळात असे काही पाहिलेले नाही. त्यामुळे हा हल्लाच आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

अमेरिकेमध्ये कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आतापर्यंत अमेरिकेमध्ये ४७ हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ८,५२,००० नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या अमेरिकेत सर्वाधिक आहे. 

अमेरिकेत कोरोना संक्रमणामुळे बेरोजगारांसाठी आणि उद्योगांसाठी पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. पण त्यामुळे तेथील सरकारवरील कर्जाचा बोजा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डोनाल्ड ट्रम्प यांनी वरील उत्तर दिले.

Best IT Comany In Maharashtra , Solapur