स्वतःचा व्हिडिओ “सुपर” म्हणणाऱ्या फडणवीसांना नेटकरी म्हणाले ” आत्मनिर्भर”
सुरज गायकवाड
ग्लोबल न्यूज: सध्या सोशल मीडियावर भाजपाच्या सर्वच नेत्यांना ईमोजी वापरून नेटकऱ्यांनी चांगलेच टार्गेट केलेले आहे. या ट्रोल करणारे बहुतेक करून सामान्य नागरिक असल्याचे दिसून आले आहे.

या ट्रोलिंगवरून काही दिवसापूर्वी भाजपा नेत्यांनी विविध पोलीस स्थानकात रीतसर तक्रारी दाखल केला होत्या. मात्र तक्रारी देऊन सुदधा भाजपा नेत्यांना ट्रोल करणे काही थांबलेले दिसून आले नव्हते. अशातच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी नागपूरमधील मेडिकलच्या विविध विभागांना भेट देत सोयींची पाहणी केली.
नागपूरमधील अधिष्ठाता कार्यालयातून त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ट्रामा केअरमध्ये उभारलेल्या कोविड रुग्णालयातील दोन रुग्णांशी संवाद साधून त्यांची चौकशी केली. फडणवीस गुरुवारी दीड वाजता मेडिकलला पोहचले व अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांच्याकडून सर्व माहिती जाणून घेतली.


फडणवीस यांनी या संदर्भातील एक व्हिडिओ आपल्या फेसबुक पेजवर शेअर केला. हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर फडणवीस यांनीच कमेंट करुन ‘सुपर’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. यावरुनच आता नेटकऱ्यांनी फडणवीस यांना चांगलेच ट्रोल केल्याचे दिसून आले होते.
या आठ सेकंदांच्या व्हिडिओमध्ये फडणवीस अत्याधुनिक बेड्सची सुविधा करण्यात आलेल्या वॉर्डमध्ये तोंडला मास्क लावून प्रवेश करताना दिसत आहेत. या व्हिडिओवर फडणवीस यांच्याच व्हेरिफाइड अकाऊंटवर टाळ्या वाजवणाऱ्या इमोन्जीच्या मदतीने ‘Super’ अशी प्रतिक्रिया दिली होती.

मात्र स्वतः व्हिडीओ पोस्ट करून प्रतिक्रिया दिल्याने अनेकांनी त्यांच्या या प्रतिक्रियेवर मजेदार कमेंट दिल्या. तुम्हीच काय कमेंट करताय असा प्रश्न काहींनी विचारला तर काहींनी ‘आत्मनिर्भर’ इतकीच कमेंट या प्रतिक्रियेला रिप्लाय देताना केली होती.
‘सर तुम्हीत धन्यवाद इमोन्जी टाकता हे जनतेने टाकले पाहिजेत’, ‘सर तुम्हीच कमेंट करायला लागले’, ‘यालाच म्हणतात स्वत:ची पाठ स्वत:च थोपटणे’, ‘स्वत:च्या पोस्टला तुम्ही स्वत: सुपर म्हणताय’ अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी या प्रतिक्रियेवर दिल्या. वाचा नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया
