स्त्री अत्याचाराच्या विरुद्ध जुळे सोलापुरात महिलांचा आक्रोश.
सोलापूर : जुळे सोलापूर शिवजन्मोत्सव सांस्कृतिक मंडळाच्या महिला समितीच्या वतीने महाराष्ट्रात समाजामध्ये विविध ठिकाणी होणाऱ्या स्त्री अत्याचाराच्या विरोधात गोविंद श्री मंगल कार्यालय जवळ त्या घटनेचा निषेध करून महिलांच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
महाराष्ट्राची प्रतिमा कलंकित करणाऱ्या काही घटना घडल्या एक तर्फी प्रेमातून हिंगणघाट ला एका प्राध्यापिकेला भररस्त्यात पेट्रोल टाकून पेटवण्यात आले औरंगाबाद सिल्लोड तालुक्यातील अंधारलेल्या घरात महिला एकटी आहे हे पाहून अत्याचाराचा प्रयत्न झाला तिने प्रतिकार करतात रॉकेल टाकून पेटवून दिले.

तसेच मुंबईतील काश्मिरा भागात बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी एकीचे अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेसाठी या सर्व घटना लज्जास्पद आहेत या सर्व घटनेचा निषेध करण्यासाठी जुळे सोलापूर शिवजन्मोत्सव सांस्कृतिक मंडळाच्या महिला समितीच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी अत्याचार करणाऱ्याला भरचौकात फाशी दिली पाहिजे त्यांनी जसं जिवंत जाळले तसं त्यांना पकडून जिवंत जाळले पाहिजे हैद्राबाद प्रमाणे गुन्हेगारांचे इन काउंटर केलं पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी नगरसेविका संगीता जाधव अनिता जगदाळे लता डेरे अभिजली जाधव राजश्री गायकवाड वैशाली शहापुरे नमिता तिथे भारती कोळी वैशाली देशपांडे मानसी गोरे आशा कांबळे मनीषा नलवडे सुनंदा साळुंखे जयलक्ष्मी पडगानूर संपदा जोशी ममता कुलकर्णी श्वेता व्हनमाने माधुरी चव्हाण मंडळाचे हेमंत पिंगळे श्याम कदम संकेत किल्लेदार उत्सव अध्यक्ष रविकांत होनकोळे आनंद बिराजदार आनिकेत कुलकर्णी चेतन चौधरी अरविंद शेळके सतीश बाजपेईं अनिकेत कबाडे आदी उपस्थित होते