सोलापूर: 254 रुग्ण बरे झाले तर 278 जणांवर उपचार सुरू ,आज 5 मृत तर 18 पॉझिटिव्ह
सोलापूर- सोलापूरात आणखीन 18 पॉझिटिव्ह रूग्ण वाढले असून एकूण संख्या 583 इतकी झाली आहे तर मृतांची संख्या 51 वर पोहोचली आहे.

एकूण 5770 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून यातील 5543 अहवाल प्राप्त झाले आहेत. यात 4960 निगेटिव्ह तर 583 पॉझिटिव्ह आहेत तर 227 अहवाल प्रतिक्षेत आहेत.
आज एका दिवसात 120 अहवाल प्राप्त झाले यापैकी 102 निगेटिव्ह तर 18 पॉझिटिव्ह आहेत. आज 5 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे तर 5 जणांना बरं झाल्यानं घरी सोडण्यात आलं.
आज रूग्ण मिळालेले विभाग पुढीलप्रमाणे – घोंगडेवस्ती भवानी पेठ 1 पुरूष.
शनिवार पेठ 1 महिला. निलमनगर 2 महिला. शास्त्री नगर 1 पुरूष. रविवार पेठ 1 पुरूष, 1 महिला.
सलगरवस्ती डोणगांव रोड 1 पुरूष. दमाणीनगर 1 महिला. गंगानगर 1 महिला.
न्यू पाच्छा पेठ 2 पुरूष. मजरेवाडी 1 पुरूष. एमआयडीसी रोड 1 महिला.
सबजेल 1 पुरूष. मुळेगांव रोड 1 महिला. वरद फार्म पुणे रोड 1 पुरूष.
पाच्छा पेठ 1 पुरूष.


आज जे 5 जण मृत पावले ते पुढीलप्रमाणे – 80 वर्षीय पुरूष रा. कर्णिकनगर,
65 वर्षीय महिला मिलिंद नगर बुधवार पेठ.
56 वर्षीय महिला जुना विडी घरकुल.
79 वर्षीय पुरूष शोभादेवी नगर नई जिंदगी.
65 वर्षीय पुरूष सलगरवस्ती डोणगांव रोड.
आत्तापर्यंत बरे होवून घरी गेलेल्या रूग्णांची संख्या 254 असून 278 जणांवर उपचार सुरू आहेत. यात 143 पुरूष आणि 135 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर शहर वगळून जिल्ह्यात केश कर्तनालय आणि ब्युटी पार्लर सुरू करण्यात काही अटींवर प्रशासनाने परवानगी दिली आहे.
सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क घालणं बंधनकारक असून रस्त्यावर थुंकण्यास बंदी करण्यात आली आहे. शिवाय दुकानदार यांनी मास्क बांधणं हात मोजे घालणं बंधनकारक असून . असे न केल्यास आता शंभर ते पाचशे रुपये दंडाची कारवाई होणार आहे.
सोलापूरचे आजचे तापमान
सोलापूरच्या तापमानाने आजही उच्चांकी झेप घेतली आहे. गेले चार दिवस सोलापुरात 44 अंशाच्या जवळपास तापमान आहे. दिवसभर उन्हाच्या झळा आणि उकाडा अशी स्थितीआहे.