सोलापूर शहरात 4 पॉझिटिव्ह तर सहा मृत्यू ; ग्रामीण जिल्ह्यात 6 कोरोना बाधित;
सोलापूर शहर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या
2350 झाली असून मृतांची संख्या 248 झाली आहे .
सध्या जिल्ह्यात 1198 जण कोरोना मुक्त झाले आहेत ,तर शहर आणि जिल्ह्यात मिळून 904 जणांवर उपचार सुरू आहेत.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सोलापूर ग्रामीण मधून आज 119 अहवाल आले. यात 113 निगेटिव्ह 6 पॉझिटिव्ह अहवाल आहेत. यात 3 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे. ग्रामीणमध्ये आज एकही मृत नाही, तर तीन जण बरे होऊन घरी परतले.

सोलापूर शहरात आज 97 अहवाल प्राप्त झाले यात 93 निगेटिव्ह तर 4 पॉझिटिव्ह आहेत .यात 1 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे. शहरात आज 6 मृतांची नोंद झाली तर 13 जण उपचार झाल्याने घरी सोडण्यात आले.
सोलापूर शहरात आत्तापर्यंत 234 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर ग्रामीण भागात ही संख्या 14 आहे.