सोलापूर मध्ये गेल्या महिन्यात एकही असा दिवस नाही की कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नाही.शनिवारी सकाळी आठ वाजता जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 9 बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

यामध्ये पाच पुरुष असून चार महिला आहेत आजचे तपासणी अहवाल 54 इतके आहेत त्यापैकी निगेटिव्ह रिपोर्ट 45 आले तर नऊ रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. यामुळे सोलापुरातील एकूण पॉझिटिव्ह बाधित रुग्णांची संख्या 860 वर गेली आहे धक्कादायक बाब म्हणजे सकाळी तीन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली यामध्ये एक पुरुष आणि दोन महिला आहेत.

आज पर्यंत सोलापुरात एकूण मृत्यू 78 झाले आहेत.हा मृत्युदर राज्यात सर्वाधिक आहे.

सोलापूर आजचा अहवाल
दि.30/05/20 सकाळी 8.00
आजचे तपासणी अहवाल – 54
पॉझिटिव्ह- 9 (पु. 5 * स्त्रि- 4 )
निगेटिव्ह- 45
आजची मृत संख्या- 3
(1पु. * स्री 2 )
एकुण पॉझिटिव्ह- 860
एकुण निगेटिव्ह – 6000
एकुण चाचणी- 6860
एकुण मृत्यू- 78
एकुण बरे रूग्ण- 351