सोलापूर वृद्धाचा ‘कोरोना’ने मृत्यू; नव्याने आढळले तीन रुग्ण एकूण रुग्णसंख्या झाली 68

0
317

सोलापूर : कोरोना बाधिताची संख्या आज 68 वर पोहोचली असून आज दोन पुरुष आणि एक महिला बाधित आढळून आल्या आहेत.आज पर्यंत एकूण रुग्णसंख्या 68 झाली आहे त्यात आजपर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मंगळवारी रात्री दिली आहे.मृत झालेल्या मध्ये 3 पुरुष तर 3 स्त्रिया यांचा समावेश आहे.

बापूजी नगरात ‘कोरोनाा’ पॉझीटीव्ह रुग्ण यापूर्वीच आढळले आहेत. त्यात बापूजी नगरातील ७६ वर्षीय वृद्धास शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अशाप्रकारे सोलापुरात कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या सहा इतकी झाली आहे. त्याचबरोबर मंगळवारी पॉझीटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये एक महिला व दोन पुरूष आहेत. यामधील महिला रेल्वे स्टेशन परिसरातील शनि मंदिराजवळ पालात राहणारी आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

या महिलेचे कुटुंब मंदिराच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत पाल टाकून गुजराण करीत होते. ही महिला स्टेशन परिसरात फिरताना आढळली. तिला सर्दी व खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. स्वॅब तपासणीत तिचा अहवाल सारी पॉझीटीव्ह आला आहे. आता नातेवाईकांचा शोध घेतला कोणीच मिळून आले नाहीत म्हणून याबाबत पोलिसांना माहिती कळविण्यात आली आहे.

बापूजीनगरात राहणारा युवक हा कोरोनाने मरण पावलेल्या वृद्धाच्या संपर्कात आला होता. त्यामुळे क्वारंटाईन करण्यात आले होते. स्वॅब तपासणीत त्याचाही अहवाल आता पॉझीटीव्ह आला आहे. दुसरा युवक सिद्धेश्वर पेठेतील आहे. त्यालाही सारीची लागण झाली आहे. त्याचा संपर्क कोणाशी आला याची माहिती उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे आरोग्य विभागामार्फत त्याची हिस्ट्र तपासण्यात येत आहे. मंगळवारी ५८ अहवाल आले. त्यात ५५ जणांचे अहवाल निगेटीव्ह आहेत. 

सोमवार दि. 28/04/2020

घरात अलगीकरण (Home Quarantino)
• घरात अलगीकरण (Home Quarantine) केलेल्या व्यक्तींची संख्या 3832 असून • 14दिवसाचा कालावधी पूर्ण झालेले Home Quarantine व्यक्तींची संख्या – 1859
• अद्याप Home Quarantine असेलेले व्यक्तींची संख्या 1973

  1. संस्थात्मक अलगीकरण (Institutional Quarantine)

• संस्थात्मक अलगीकरण (Institutional Quarantine) केलेल्या व्यक्तींची संख्या – 1837
• 14 दिवसाचा कालावधी पूर्ण झालेले Institutional Quarantine व्यक्तींची संख्या – 967
• अद्याप Institutional Quarantine असलेले व्यक्तींची संख्या 870

  1. Isolation रग्णांची माहिती
    • एकुण तपासणी केलेल्या व्यक्ती 1469
    • प्राप्त तपासणी अहवाल 1133

प्रलंबित तपासणी अहवाल 336
निगेटिव्ह अहवाल 1065
• पॉझिटिव्ह अहवाल 68

  1. आज प्राप्त झालेले अहवाल

• प्राप्त अहवाल 58 असून
• निगेटिव्ह अहवाल 55 आहेत
• पॉझिटिव्ह अहवाल 3 आहेत.

– 3 (पुरुष – 2 स्त्री – 1) आज मयत – 1 पुरुष

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-

Best IT Comany In Maharashtra , Solapur