सोलापूर रात कोरोना बाधितांची संख्या झाली 153 ; एक मृत

0
303

सोलापुरातील कोरोना बाधितांची संख्या आज 8 ने वाढून 153 झाली आहे.अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी बुधवारी दिली. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. ‘कोरोना’मुळे एमआयडीसी पाेलीस ठाण्यातील साहाय्यक फौजदाराचा मृत्यू झाला आहे. हे साहाय्यक फौजदार वालचंद कॉलेजजवळील एकता नगरचे रहिवासी होते. कोरोनाचा जिल्ह्यातील हा दहावा बळी आहे. 

काल मंगळवारी रात्री पर्यंत सोलापुरातील बाधितांची संख्या 145 होती.अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली होती.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सोलापुरात आयसोलेशन वार्डात असणाऱ्या रुग्णांपैकी आत्तापर्यंत 2633 जणांची कोरोना स्वॅब चाचणी घेण्यात आली .यापैकी 2369 अहवाल प्राप्त झाले आहेत. यात 2216 निगेटिव्ह ,तर 153 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत.

जिल्हा प्रशासनाने याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की,आज एका दिवसात सोलापुरात 197 चाचणी अहवाल आले. यात 189 निगेटिव्ह तर 8 पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 8 पुरुष असून 1 मयत आहे. एकता नगर परिसरात राहणारा 57 वर्षे वयाचा पुरुष 5 मे रोजी मरण पावला.

आज सदर बाजार लष्कर येथील दोन पुरुष साईबाबा चौक येथील एक पुरुष एकता नगर सोलापूर येथील एक पुरुष मोदी भागातील दोन पुरुष रोड राहुल गांधी झोपडपट्टी येथील एक पुरुष सिद्धेश्वर पेठ येथील एक पुरूषाचा समावेश आजच्या बाधित व्यक्तींमध्ये होतोय.

या पाेलिसाचा दफनविधी करण्यात आला आहे. कोरोनामुळे मंगळवारी नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले होते. बुधवारी आणखी एकाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून, हा दहावा बळी आहे. 

सोलापुरातील कोरोना विषाणू संसर्गाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे .या पार्श्वभूमीवर पुणे विभागीय आयुक्त महसूल डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज सोलापुरात येऊन प्रशासकीय कामाचा आढावा घेतला.

जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते. 39 प्रतिबंधित विभागात कोरोनाचा संसर्ग झाला आहे. याचं संक्रमण कुठून सुरु झालं याचा शोधही सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार इस्पितळातून याच संक्रमण सुरू झाल असावं असही विभागीय आयुक्तांनी प्रसिद्धीमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.मात्र ते नक्की कोणतं इस्पितळ किंवा इतर तपशीलवार माहिती लगेचच उपलब्ध झाली नाही.

Best IT Comany In Maharashtra , Solapur