सोलापूर रात कोरोनानं दोघांचा मृत्यू तर 13 पॉझिटिव्ह रूग्ण- एकूण रुग्ण 343

0
268

सोलापूर रात कोरोनानं दोघांचा मृत्यू तर 13 पॉझिटिव्ह रूग्ण- एकूण रुग्ण 343

सोलापूर- सोलापूरातील कोरोनाबाधितांची संख्या आता 343 इतकी झाली आहे. आज सायंकाळी 7.30 वाजता प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकात प्रशासनानं ही माहिती दिली आहे. तर आत्तापर्यंत 24 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज दोघांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

आत्तापर्यंत कोरोना स्वॅब 3833 जणांची घेण्यात आली. यापैकी 3586 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात 3243 निगेटिव्ह तर 343 पॉझिटिव्ह आहेत तर अद्याप 247 अहवाल प्रलंबित आहेत.

आज एका दिवसात 105 अहवाल प्राप्त झाले यापैकी 92 निगेटिव्ह तर 13 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. यात 8 पुरूष आणि 5 महिलांचा समावेश आहे. तर आज 7 जणांना बरं झाल्यानं घरी सोडण्यात आलं.

आज जे रूग्ण मिळून आले यात

लष्कर 2 पुरूष, 1 महिला.

विजापूर नाका 1 पुरूष.

नवनाथ नगर एमआयडीसी 1 महिला.

बापूजी नगर 1 महिला.

शास्त्रीनगर 1 पुरूष.

दत्त चौक 1 महिला.

कुमारस्वामीनगर 2
पुरूष.
अरविंदधाम पोलीस वसाहत 1 पुरूष.

भगवान नगर 1 महिला.

सिव्हील हॉस्पिटल हॉस्टेल 1 पुरूष.

आत्तापर्यंत 343 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. यामध्ये 188 पुरूष तर 155 महिला आहेत तर मृत 24 मध्ये 13 पुरूष आणि 11 महिलांचा समावेश आहे.

रूग्णालयातून आत्तापर्यंत 113 जणांना बरं झाल्यानं घरी पाठविण्यात आलं आहे तर रूग्णालयात दाखल असणार्‍यांची संख्या 206 इतकी आहे.

आज मृत पावलेली व्यक्ती 63 वर्षीय पुरूष असून नाथसंकुल सिव्हील हॉस्पिटलजवळ येथील रहिवासी आहे. त्यांना 10 मे रोजी सिव्हीलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांचा दि. 15 रोजी मृत्यू झाला तर दुसरी व्यक्ती शास्त्रीनगर महादेव चौक येथील रहिवासी 58 वर्षीय पुरूष आहे.12 मे रोजी त्यांना दाखल करण्यात आलं होतं आज सकाळी ते मृत पावले.

गेले काही दिवस स्वच्छतेसाठी बंद असलेलं अश्विनी सहकारी रुग्णालय हे पुन्हा एकदा रूग्णांच्या सेवेसाठी रूजू झाल आहे. आज प्रसिद्धी पत्रकान्वये वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.कोरोना व्यतिरिक्त इतर सर्व रुग्णांना येथे सुविधा उपलब्ध होणार आहेत.

पालक मंत्री दत्तात्रय सोलापूर दौऱ्यावर होते त्यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांकडून कोरोना संबंधात माहिती घेतली ते म्हणाले सध्या पॉझिटिव्ह आकडा वाढत असला तरी येत्या काही दिवसात सुधारलेली स्थिती दिसून येईल

Best IT Comany In Maharashtra , Solapur