सोलापूर मध्ये कोरोनाचा हाहाकार,एकाच दिवशी सापडले तब्बल “एवढे” रुग्ण;बधितांमध्ये पोलिसांचा ही आकडा मोठा

0
294

सोलापूर: सोलापुरातील कोरोना बाधितांच्या आकड्यामध्ये दररोज वाढ सुरूच असून आज ही मोठी भर पडली आहे. त्यामुळे बाधितांचा आकड्या २६४ वर पोहचला आहे. आज ४८ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एकाच दिवशी आतापर्यंत सर्वाधिक ४८ लोकांना बाधा झाल्याचे समोर आले आहे. यात २९ पुरुष आणि १९ महिलांचा समावेश आहे.

आज दिवसभरात १३२ जणांचे अहवाल प्राप्त झाले त्यात ८४ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले तर केगाव येथून इन्स्टिटय़ूट क्वारंटाइन मधून १४८ घरी सोडण्यात आले. रुग्णालयातून बरे होऊन आज घरी गेलेल्या बाधित रुग्णांची संख्या १२ असून यात नऊ पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या एकूण संख्या ४१ आहे

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

आज आलेल्या अहवालांमध्ये धक्कादायक माहिती अशी की एकूण सात पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यात एका पी. आय आणि इतर पोलीस कर्मचा-याचा समावेश आहे. तसेच आज शहराबाहेरील म्हणजेच सावळेश्वर तालुका मोहोळ येथील एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच पाटकूल आणि ढोक बाभुळगाव या मोहोळ येथील दोन गावातील रुग्णांना कोरोना ची बाधा झाली आहे.

संजीवनगर एमआयडीसी रोड, गजानन नगर जुळे सोलापूर, बजरंगनगर होटगी रोड, सम्राट चौक आंबेडकर उद्यानाजवळ मंत्री चंडक, मंत्री चंडक पोलिस कॉलनी सम्राट चौक, रविवार पेठ, पोलीस वसाहत मुरारजी पेठ, समृद्धी हेरिटेज जुळे सोलापूर, निर्मिती टॉवर मोदीखाना, अश्विनी हॉ. ग्रामीण रुग्णालय कुंभारी, सिद्धेश्वर पेठ, सदर बाजार लष्कर,

लोकसेवा शाळेजवळ, शास्त्रीनगर, बुधवार पेठ मिलिंदनगर, तेलंगी पाच्छापेठ, तुळशांतीनगर विडी घरकुल, सिद्धार्थ चौक, कुमार स्वामीनगर, नीलम नगर, हुडको कॉलनी कुमठा नाका, मोदीखाना, गवळी वस्ती जुना कुंभारी रोड, कुंभारी नाका, सिव्हिल क्वार्टर सोलापूर, मुलींचे वसतिगृह होटगी नाका, सहारानगर मजरेवाडी, शिवाजीनगर मोदी, पाटकूल तालुका मोहोळ, ढोकबाभुळगाव तालुका मोहोळ , सावलेश्वर तालुका मोहोळ या बत्तीस ठिकाणातील लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे.

सोलापुरात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या २०९ असून यात ११७ पुरुष आणि ९२ महिलांचा समावेश आहे. तर आतापर्यंत चौदा लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

नवे रुग्ण
संजीव नगर MIDC रोड -१
गजानन नगर जुळे सोलापूर -१
बजरंग नगर होटगी रोड -१
सम्राट चौक मंत्री चांडक -१
मंत्री चांडक पोलीस कॉलनी -१
रविवार पेठ -१
पोलीस वसाहत मुरारजी पेठ -१
समृद्धी हेरिटेज जुळे सोलापूर -१
निर्मिती टॉवर मोदीखाना -१
अश्विनी हॉस्पिटल कुंभारी -१
सिद्धेश्वर पेठ -८
सदर बाजार लष्कर -४
लोकसेवा हायस्कूल परिसर -१
शास्त्रीनगर – ७
मिलिंद नगर बुधवार पेठ -१
तेलंगी पाच्छा पेठ -१
तुळशांती नगर-बीडी घरकुल -१
सिद्धार्थ चौक -१
कुमार स्वामी नगर -१
नीलम नगर-१
हुडको कॉलनी कुमठा नाका -२
मोदीखाना -१
गवळी वस्ती -१
कुंभारी नाका -१
सिव्हिल क्वार्टर -१
मुलींचे वसतिगृह होटगी नाका -१
सहारा नगर मजरेवाडी -१
शिवाजी नगर मोदी -१
पाटकूल -१
बाभूळगाव ता. मोहोळ -१
सावळेश्वर ता. मोहोळ -१

आजतागायत १४ मृत्यू.
बरे झालेले रुग्ण ४१

२०९ कोरोनाबधितांवर उपचार सुरू

Best IT Comany In Maharashtra , Solapur