सोलापूर: दिवसभरात तब्बल 50 रूग्ण वाढले; तिघांचा मृत्यू ,बधितांचा आकडा झाला 435

0
254

सोलापूर: दिवसभरात तब्बल 50 रूग्ण वाढले; तिघांचा मृत्यू ,बधितांचा आकडा झाला 435

सोलापूर-(दि.18) सोलापूरात आज आणखीन 50 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण वाढले आहेत. यात 34 पुरूष आणि 16 महिलांचा समावेश आहे तर मृतांची संख्या 3 नं वाढून 29 इतकी झाली आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

आत्तापर्यंत 4663 व्यक्तींची कोरोना चाचणी घेण्यात आली यातील 4418 अहवाल प्राप्त झाले आहेत. यात 3983 निगेटिव्ह तर 435 पॉझिटिव्ह अहवाल आहेत.

आज एका दिवसात 319 अहवाल प्राप्त झाले यात 269 निगेटिव्ह तर 50 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. बरं झाल्यानं रूग्णालयातून 7 जणांना आज घरी सोडण्यात आलं. तर 241 जण आजून रूग्णालयात उपचार घेत आहेत.

आज जे 50 रूग्ण मिळाले ती ठिकाणं पुढीलप्रमाणे –
निलम नगर 4 पुरूष. किसान संकुल अ.कोट रोड 1 महिला.
हत्तुरे वस्ती 1 पुरूष. इरण्णा वस्ती 1 पुरूष. जोशी गल्ली 1 पुरूष, 1 महिला.
कुमठा नाका 3 पु रूष, 2 महिला.
बुधवार पेठ 1 पुरूष, 1 महिला.
जुना कुंभारी नाका 1 महिला.
अशोक चौक 2 महिला. नई जिंदगी 1 पुरूष.
दत्त चौक 1 पुरूष.
न्यू पाच्छापेठ 1महिला.
इंदिरा नगर 1 पुरूष. लोकमान्य नगर 1 पुरूष.
मिलिंद नगर बुधवार पेठ 7 पुरूष, 5 महिला. मोदी 1 पुरूष.
मुरारजी पेठ 1 पुरूष. पाच्छा पेठ 2 पुरूष. रेल्वे लाईन्स 2 पुरूष. रविवार पेठ 2 पुरूष, 1 महिला.
साईबाबा चौक 1 पुरूष, 1 महिला.
शिवशरण नगर एमआयडीसी 1 पुरूष. साठे पाटील वस्ती 1 पुरूष. सिध्देश्वर पेठ 1 पुरूष.

आज जे 3 रूग्ण मृत पावले यात शुक्रवार पेठेतील 54 वर्षीय पुरूष 16 मे रोजी दाखल झाले होते. दुसरी व्यक्ती हत्तुरे वस्ती परिसरातील 60 वर्षीय पुरूष दि. 15 रोजी सिव्हीलमध्ये दाखल झाले होते. तर तिसरी व्यक्ती शुक्रवार पेठे परिसरातील 55 वर्षीय पुरूष असून ते दि. 14 मे रोजी सिव्हीलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते.

Best IT Comany In Maharashtra , Solapur