सोलापूर जिल्ह्यात प्रथमच महाराष्ट्र विद्यालयात उभारली अत्याधुनिक सर्वात मोठी प्रयोगशाळा
बार्शी : सोलापूर जिल्ह्यात प्रथमच बार्शीतील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महाराष्ट्र विद्यालयात उभारण्यात आलेल्या सर्वाधिक मोठ्या आणि अत्याधुनिक प्रयोगशाळेचे उद्घाटन आज कर्मवीर जयंती सप्ताह चे औचित्य साधून जेष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ मीनाक्षी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी संस्थेचे सचिव विष्णु पाटील, कार्यकारिणी सदस्य सुरेश पाटील, जयकुमार शितोळे,प्राचार्य डी बी पाटील, प्रकाश पाटील, दिलीप रेवडकर, आबा शेळवणे, सोपानराव मोरे, चंद्रकांत मोरे,आदी सह विज्ञान शाखेचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
महाराष्ट्र विद्यालयात इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत चे सुमारे २६५६ विद्यार्थी आहेत.


या अत्याधुनिक प्रयोगशाळेत जीव,भौतिक आणि आणि रसायन शास्त्रचे ८२ विद्यार्थी एक वेळी प्रयोग करू शकतात.प्राणी शास्त्र ,आवर्त सारणी,मानवी शरीराचे कृत्रिम अवयव, सर्व शास्त्रज्ञ यांची सचित्र माहिती, त्यांनी केलेले संशोधन, सर्व प्रकारची केमिकल्स,शिवाय प्राणी, वन्य जीव मारण्यासाठी कायद्याने बंदी आहे पण विद्यार्थ्यांना ज्ञान प्राप्त व्हावे आणि स्वतः प्रयोग करता यावे म्हणून व्हर्च्युअल डिटेक्शन लॅब आणि प्रोजेक्टर ची उभारणी करण्यात आली आहे यासाठी सुमारे तीन लाख रुपये खर्च झाला असल्याचे विज्ञान शिक्षक सचिन देशमुख यांनी सांगितले.
चौकट
जगदाळे मामांच्या जयंती निमित्त आज महाराष्ट्र विद्यालयात हायस्कूल मधील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने भोजन देण्यात आले.यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.