सोलापूर जिल्ह्यातील या तालुक्यात संचारबंदी; जिल्हाधिकाऱ्यांनी केले आदेश जारी

0
296

सोलापूर जिल्हयातील करोना विषाणू (कोव्हीड १९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सोलापूर ग्रामीण विभागात असलेल्या दक्षिण सोलापूर, मोहोळ, उत्तर सोलापूर व अक्कलकोट,तालुक्यामध्ये संपूर्ण संचारबंदी लागू करुन तालुक्याच्या सर्व हद्दी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोमवारी रात्री जाहीर केले.

सदर विषाणुची लागण एका संक्रमीस रुग्णाकडून अन्य व्यक्तीस / इसमास त्याच्या संपर्कात आल्याने होते.
सध्या सोलापूर शहरामध्ये कोरोना विषाणूमुळे बाधित होणा-या रुग्णाची संख्या दररोज वाढत आहे.
सोलापूर ग्रामीण घटकातील दक्षिण सोलापूर, मोहोळ, उत्तर सोलापूर व अक्कलकोट तालुक्यांमध्ये बहुतांश गावे ही सोलापुर शहर महानगरपालिका हद्दीस लागून आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सध्या जीवनावश्यक वस्तु खरेदी विक्री करणेकामी या तालुक्यांमधील व्यक्तींची सोलापूर शहरामध्ये येणे-जाणे असते. सोलापूर शहरातील कोरोना आजाराचा वाढता प्रार्दुभाव व प्रसार ग्रामीण भागात या माध्यमातून होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील कोरोना आजाराचा प्रार्दुभाव रोखणेकरीता दक्षिण सोलापूर, मोहोळ, उत्तर सोलापूर व अक्कलकोट तालुक्यामध्ये संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सोमवारच्या मध्यरात्रीपासून तीन मे तारखेपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत.

सदरचा आदेश खालील बाबीस लागु राहणार नाही
१. अत्यावश्यक वैद्यकीय सेवा पुरविणारे खाजगी/सरकारी रुग्णालये. दवाखाने, आरोग्य सेवा देणारे डॉक्टर व
वैद्यकीय सेवेशी संबंधीत सर्वेक्षण करणारे अधिकारी/कर्मचारी.

२. जीवनावश्यक सेवेतील यामध्ये औषधे व वैद्यकीय उपकरणे, तसेच तेल व गॅस उत्पादन-वितरण करणारे
कारखाने/आस्थापने तसेच ज्या उद्योगात स्थानिक रहिवास असलेल्या [Insitu) कामगारांचा समावेश आहे.

असे उद्योग. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने दि. १७/४/२०२० रोजी पारित केलेल्या आदेशाच्या अनुषंगाने सुरु असलेल्या किंवा चालु होणा-या उद्योग- धंद्यांना हा आदेश लागु राहणार नाही. मात्र सदर कारखान्यांनी Insitu कामगारामार्फत काम करावे व चे कडक पालन करावे.

३. कायदेशीर कर्तव्य बजावित असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी उदा. महसूल, पोलीस, पाणीपुरवठा, अग्निशमक, विद्युत पुरवठा विभागातील कार्यरत अधिकारी/कर्मचारी.

४. रुग्णालयामध्ये व दवाखान्या संलग्न असणारे औषधांची दुकाने व अनुषंगिक वैद्यकिय उपकरणे इत्यादींची दुकाने नियमितपणे चालू राहतील तथापि सदर दुकाने/ आस्थापना यांना नियमित वेळेशिवाय २४×७ चालू ठेवण्यास देखिल मुभा राहील.

५. रास्त भाव धान्य दुकाने नियमित वेळेत चालू राहतील.
६. इतर किराणा माल, बेकरी केक शॉप वगळून), फळे व भाजीपाला दुध व दुग्ध जन्य पदार्थ विक्री व वितरण
करणारी यंत्रणा/ दुकाने, अंडी ,मांस, मासे इत्यादींची दुकाने सकाळी ०६ ते दुपारी १२.०० पर्यंत चालू राहतील.

७. खते किटकनाशके बी-बियाणे विक्री इत्यादी बाबींची दुकाने / आस्थापना, कृषी करिता लागणारी यंत्रांची
दुकाने, त्यासाठीचे आवश्यक सुटे भाग त्यांचा पुरवठा करणारी व दुरुस्ती करणारी दुकाने सकाळी ०६ ते
१२.०० पर्यंत चालू राहतील.

८. पेट्रोल पंप सकाळी ०६ ते १२ वा. पर्यंत चालू राहतील.तथापि अॅम्बुलन्स डॉक्टर व वैद्यकिय सेवेतील कर्मचारी, ‘अत्यावश्यक सेवेतील शासकिय वाहने तसेच महसुल, पोलीस, पाणीपुरवठा, अग्नीशामक इत्यादी विभागांच्या वाहनांसाठी नियमित वेळेनुसार चालू राहतील,
९. शिवभोजन केंद्र नियमीत वेळेत चालु ठेवावेत.

१०. सर्व बँकामधील कामकाजाची वेळ सकाळी ०८.०० ते दुपारी २.०० वा. पर्यंत राहील. याकामी बैंकाचे एटीएम व संलग्न सेवा, रोकड वाहतुकीच्या सेवा देणा-या कंपन्या इत्यादी आस्थापनांनी कमीत कमी मनुष्यबळाचा।वापर करावा.
११. कृषी उत्पन्न बाजार समित्यामधील फळे व भाजीपाला लिलाव बंद राहतील.

सर्व प्रकारची रस्ते, रेल्वे, हवाई वाहतुक सेवा बंद राहतील तथापि यामधून महत्त्वाच्या व अत्यावश्यक वस्तूंची
ने-आण करणे, अग्निशमन, कायदा व सुव्यवस्था तसेच तातडीची सेवा इत्यादीच्या अनुषंगाने करण्यात
येणा-या वाहतुकीस वगळण्यात येत आहे.

प्रत्येक व्यक्तीने परस्परांपासून किमान तीन फुटाचे सुरक्षित अंतर राखण्याचा दंडक पाळणे आवश्यक आहे असेही आदेशात नमूद केले आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur