महाराष्ट्र राज्यात भाजप सरकरची सत्ता जाऊन शिवसेना,काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यापक्षाचे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले.
पालकमंत्री पद वाटपामध्ये सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडे आहे,महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे गेले

नंतर मध्यंतरी हे पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे आले परंतु सध्या जितेंद्र आव्हाड हे आजारी असल्यामुळे सोलापूर जिल्हा पालकमंत्री पदाची जबाबदारी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडे आल्याचं समजतं.
आज राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची सोलापूर पालकमंत्री पदी निवड झाली आहे.
कोण आहेत दत्तात्रय भरणे?
दत्तात्रय भरणे हे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे विश्वासू समर्थक आहेत.


अजित पवार यांनी दत्तात्रय भरणे यांना कारखाना चेयरमन,पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष,आमदार ते आता राज्यमंत्री अशी पद दिली आहेत.
दत्तात्रय भरणे यांनी 2014 साली पूर्वाश्रमीचे दिग्गज काँग्रेस नेते तथा विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान भाजपवासी झालेले हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता व प्रथम आमदार झाले होते.
आता विधानसभा निवडणुकीतही दत्तात्रय भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना चितपट केलं होतं
व त्याचच बक्षीस म्हणून मंत्रिपद दिल गेल्याच बोललं जातं आहे.