सोलापूर ची कोरोना हॉटस्पॉट च्या दिशेने वाटचाल सुरू ;कोरोना रुग्णांची संख्या झाली 25

0
315

सोलापूर  : कोरोनाचे आणखी 4 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली, सोमवारी सकाळी मिळालेल्या आवाजामध्ये सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आणि सायंकाळी चार रुग्णांची भर पडल्याने  शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन मृतांसह सोलापुरात कोरोणा रुग्णांची संख्या 25 वर गेली आहे. 

जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सोमवारी सकाळी  सांगितलेल्या माहितीमध्ये सहाजण कोरोना पॉझिटिव आढळले आहेत. त्यामधील दोघांना सारीचीही लागण झाली आहे. कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये २ महिला आणि ४ पुरुषांचा समावेश आहे. यासोबत सोलापुरातील कोरोनाबाधितांची संख्या २१ वर पोहोचली होती. यामध्ये बापूजी नगर मध्ये १, कुर्बान हुसेन नगर १, पाच्छापेठ २, जगन्नाथ नगर १, भद्रावती पेठ १ असे आढळलेले रुग्ण आहेत. 

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

6 कंटेनमेंट झोन घोषित…

पाच्छा पेठ, रविवार पेठ इंदिरानगर, जगन्नाथ नगर,कुर्बान हुसेन नगर परिसर, बापुजी नगर परिसर कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहेत.

कोरोना : सोलापुर जिल्ह्यातील सद्य परिस्थिती

१) होम क्वॉरंटाइन झालेल्या एकूण व्यक्ती : 1887

२) होम क्वॉरंटाइन पूर्ण केलेल्या व्यक्ती : 692 (14 दिवस कालावधी पूर्ण)

३) अद्याप होम क्वॉरंटाइनमध्ये असलेल्या : 1195 (हाताला शिक्के लावलेले)

४) इन्स्टिट्यूशनल क्वॉरंटाइन मध्ये
1139 व्यक्ती होत्या. त्यापैकी 451जणांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. तर 688 व्यक्ती अद्यापही इन्स्टिट्यूशनल क्वॉरंटाइन मध्ये असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

५) आयसोलेशन वॉर्डमध्ये 692 रुग्ण, तपासणी पूर्ण केलेल्या 630 व्यक्ती (तपासणी अहवाल प्राप्त)
605 व्यक्ती निगेटिव्ह .25 व्यक्ती पॉझिटिव्ह त्यामध्ये 2 मृत व्यक्तीचा समावेश आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur