सोलापूर ग्रामीणच्या पथकाचा अलीपुर बायपास जवळ जुगार अड्डयावर छापा, अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त,चोवीस जण ताब्यात

  0
  332

  सोलापूर ग्रामीणच्या विशेष पोलीस पथकाचा जुगार अड्डयावर छापा, 

  २ लाख ३१ हजार रोख रक्कमेसह ७ लाखाचा मुद्देमाल जप्त, तालुका पोलीसांत गुन्हा दाखल 

  आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

  बार्शी : 

  सोलापूर ग्रामीणच्या विशेष पोलीस पथकाने बार्शीतील अलिपूर रस्त्यावरील बायपास चौकातील कृष्णा हॉटेलच्या पाठीमागे जुगार अड्ड्यावर छापा मारून २ लाख ३१ हजार ३५० रोख रक्कमेसह एकूण ७ लाख ६ हजार ८५० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. पैशाच्या सहायाने पैजेवर जुगार खेळणाऱ्या २४ जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले. पोलीस मुख्यालयातील पोलीस शिपाई कल्याण भोईटे यांनी तालुका पोलीसांत फिर्याद दिली. संशयितांविरोधात मुंबई जुगार कायदा कलम १२ अ प्रमाणे गुन्हा दाखल केला. 


  सोलापूर ग्रामीणचे विशेष पोलीस पथक अवैध धंदयावर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत असताना त्यांना बार्शी शहराबाहेरील बायपास चौकातील कृष्णा हॉटेल पाठीमागे काही अंतरावर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये काहीजण जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी सदरच्या जुगार अड्ड़्यावर छापा टाकला.

  त्यावैळी मुसा सयद, प्रविण स्वामी, परशुराम जाधव, किरण कुंभार,इरफान शेख, अमोल पवार, राहूल उंदर, प्रकाश राऊत, संतोष धुमाळ, सुनिल पवार, दशरथ शेंडगे, समाधान डोंगरे, विजय आवटे, प्रशांत मगर, राजू सालपे, बालाजी तुपसमिंदर, एलियास शेख, संतोष महाडिक, सर्फराज सयद, सचिन ढोले, महेश पवार, गोरख कापरे, रोशन माने जुगार खेळताना आढळले. चौकशीत सदर जुगार अड्डा समाधान डोंगरे व अमोल पवार असे दोघेजण चालवत असलेचे सांगितले.

  जुगार सुरू असलेले पत्राशेड दिपक सुरवसे यांचे असून ते मासिक भाडेतत्वावर दिले असल्याचे डोंगरेने सांगितले. पोलीसांनी पत्ते, रोख रक्कम, मोबाईल, मोटारसायकली असा ७ लाख ६ हजार ८५० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीसांनी २५ जणांवर गुन्हा दाखल केला.

  Best IT Comany In Maharashtra , Solapur