सोलापूर मध्ये कोरोना बाधितांची संख्या आता 360 इतकी झाली आहे.
आज शनिवार दिनांक 16 रोजी सकाळी नऊ वाजता जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 17 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे यामध्ये दहा पुरुष असून सात स्त्रियांचा समावेश यामध्ये होतो आज एकूण 148 तपासणी अहवाल प्राप्त झाले त्यापैकी 131 अहवाल निगेटिव्ह असून सतरा अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत.

आजच्या माहितीनुसार एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 360 झाली आहे वरच्यावर सोलापुरातील हा धोका वाढत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

आज सकाळी 148 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 17 पॉझिटिव्ह अहवाल आहेत. त्यात दहा पुरुष आणि सात महिलांचा समावेश आहे. तर 131 निगेटिव्ह अहवाल आले आहेत. आज एकाही मृत नोंद नाही.

आत्तापर्यंत 3734 जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. यापैकी ते 3374 निगेटिव्ह तर 360 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. आतापर्यंत एकूण 24 जणांचा मृत्यू झालाय तर 113 जण बरे झाले आहेत .