सोलापूर: आज18 जण पॉझिटिव्ह तर 35 जण झाले बरे, एकूण रुग्णसंख्या झाली 488

0
276

बरे झाले 210 एकूण पॉझिटिव्ह 488


सोलापूर: सोलापूरातील कोरोनाबाधितांची संख्या आज 488 वर पोहोचली आहे तर मृतांची संख्या 35 झाली आहे.
आत्तापर्यंत 5217 जणांची कोरोनाचाचणी झाली आहे यातील 5014 अहवाल प्राप्त झाले यात 4526 निगेटिव्ह तर 488 पॉझिटिव्ह अहवाल आहेत. एकूण 203 अहवाल प्रलंबित आहेत

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

आज एका दिवसात 183 अहवाल प्राप्त झाले यात 165 निगेटिव्ह तर 18 पॉझिटिव्ह अहवाल आहेत. यात 10 पुरूष 8 महिलांचा समावेश आहे. मृतांची संख्या 35 झाली असून यात 19 पुरूष आणि 16 महिलांचा समावेश आहे.

आत्तापर्यंत रूग्णालयातून बरे होवून घरी गेलेल्यांची संख्या 210 इतकी झाली आहे तर 244 जणांवर उपचार सुरू आहेत.

आज मृत पावलेली व्यक्ती उत्तर सदर बझार लष्कर येथील 72 वर्षीय पुरूष आहे. 17 मे रोजी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं बुधवारी मृत्यू झाला.

आज जे रूग्ण मिळून आले त्यांची माहिती पुढीलप्रमाणे –
अशोक चौक 1 महिला.

न्यू पाच्छा पेठ 1 पुरूष, 2 महिला.

उत्तर कसबा पत्रा तालीम 1 पुरूष.

कुर्बान हुसेन नगर 1 पुरूष.

केशव नगर झोपडपट्टी 1 महिला.

धुम्मा वस्तीभवानी पेठ 1 पुरूष.

निलम नगर 1 पुरूष.

सिव्हील हॉस्पि. क्वार्टर 1 महिला.

बेगम पेठ 1 पुरूष.

बुधवार पेठ 1 महिला.

न्यू बुधवार पेठ 1 पुरूष.

कुमार स्वामी नगर 1महिला.

रेल्वे लाईन 1पुरूष.

कुमठा नाका 1 पुरूष.
बाळीवेस 1

पुरूष. पाच्छा पेठ 1 महिला.

पालकमंत्री दत्तात्रय भरणे आज सोलापुरात होते. त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोरोना आणि इतर विषयांवर चर्चा केली.

सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील डॉक्टरांनी आपली खाजगी हॉस्पिटल्स तातडीने सुरू करावीत अन्यथा प्रशासनाला कारवाई करावी लागेल असा निर्वाणीचा इशारा त्यांनी आज दिला आहे. खाजगी हॉस्पिटल बंद असल्याने सिव्हील हॉस्पिटल मध्ये गर्दी वाढत आहे ,असही भरणे म्हणाले.

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना त्यासाठी हॉस्पिटल उपलब्ध करण्याची प्रशासनाची तयारी सुरू आहे .या अंतर्गत आता वाडिया रुग्णालयात 125 खाटांची सोय करून हे रुग्णालय पुन्हा सुरू करण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचं पालिका आयुक्त दीपक तावरे यांनी सांगितले. आज त्यांनी या हॉस्पिटलची यादृष्टीने पाहणीही केली.

*

Best IT Comany In Maharashtra , Solapur