सोलापूर: सोलापुरातील कोरोनाची वाढ ही दिवसेंदिवस सुरूच असून बुधवारी रात्री 14 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर आज गुरुवारी सकाळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ‘कोरोना’ संसर्ग प्राप्त झालेले अहवाल 62 असून त्यापैकी निगेटिव्ह अहवाल 54 आहेत आज 8 पॉझिटिव्ह अहवाल मिळालेले आहेत. यामध्ये 4 पुरुष तर 4 स्त्रियांचा समावेश होतो. एकूण रुग्ण संख्या 478 झाली आहे.
सोलापूर कोरोना अहवाल
21/05/20 सकाळी 8.00
आजचे तपासणी अहवाल -62
पॉझिटिव्ह- 8 (पुरुष-04* स्त्री-04 )
निगेटिव्ह-54
आजची मृत संख्या-0
एकूण पॉझिटिव्ह-478
एकूण निगेटिव्ह -4415
एकूण चाचणी-4893
एकूण मृत्यू-33
एकूण बरे रूग्ण-175

दरम्यान बुधवारी दि.20 मे रोजी सायंकाळी प्राप्त झालेले अहवाल 219 होते त्यापैकी निगेटिव्ह अहवाल 205 आहेत त्यामध्ये 14 पॉझिटिव्ह अहवाल मिळाले होते. यामध्ये सात पुरुष तर 7 स्त्रियांचा समावेश होतो.बुधवारी 7 रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले तर 3 व्यक्ती मृत पावली आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
या भागातील आहेत रुग्ण…
भगवान नगर पोलीस मुख्यालय जवळील दोन स्त्रिया, साईबाबा चौक येथील एक पुरुष ,दोन महिला ,बापूजी नगर येथील एक पुरुष अशोक चौक परिसरातील एक महिला ,रामवाडी एक पुरुष ,दक्षिण सदर बाजार एक स्त्री ,सलगर वस्ती एक पुरुष, कुमठा नाका एक पुरुष ,भारतरत्न इंदिरा नगर दोन पुरुष ,जुना विडी घरकुल एक महिला

आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या 470 आहे ज्यामध्ये 262 पुरुष तर महिला 208 आहेत. आजपर्यंत एकूण 33 जणांना आपले प्राण गमवावे लागले .यात वीस पुरुष तर महिला तेरा आहेत.
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 262 आहे तर रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले 175 व्यक्ती आहेत.
3 व्यक्तींचा मृत्यू…
आज साईबाबा चौक परिसरातील एक 74 वर्षाची व्यक्ती मयत झाली तर दुसरी व्यक्ती ही अशोक चौक परिसरातील आहेत. ते77 वर्षाचे पुरुष आहेत तर तिसरी व्यक्ती शनिवार पेठ परिसरातील 64 वर्षाची महिला आहे.