सोलापूरात कोरोना बधितांचा आकडा झाला 50 , 9 नवीन रुग्ण पॉझिटिव्ह, सांगोल्यातही आढळला एक रुग्ण

0
287

सोलापूरात कोरोना बधितांचा आकडा झाला 50 , 9 नवीन रुग्ण पॉझिटिव्ह, सांगोल्यातही आढळला एक रुग्ण

सोलापूर : कालपर्यंत रुग्णांची संख्या 41 होती आज ती संख्या नऊ ने वाढल्यामुळे पन्नास झाली आहे. हे पैकी पाच रुग्ण हे सारी आजाराचे आहे. तीन व्यक्ती पूर्वी पॉझिटिव असलेल्या रुग्णांच्या संपर्कातील आहेत चार रुग्ण शांती नगर परिसरातील आहेत. एक रुग्ण कुमठा नाका परिसरातील तर एक रुग्ण लष्कर भागातील दोन रुग्ण मोदीखाना भागातील तर एक रुग्ण सांगोला भागातील असल्याची माहितीमाहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सांगोला तालुक्यातील रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे तसेच तो परिसर कंटेनमेंट म्हणून जाहीर करण्यात आला आहे आज 82 अहवाल प्राप्त झालेमाहिती आज शनिवारी संध्याकाळी जिल्हाधिकारी यांनी दिली. व्यक्तींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सोलापुरात कोरोना विषाणूचा विळखा वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे आणि ही मोठी गंभीर बाब आहे. सद्यस्थितीत सारी आजाराचा शिरकाव सोलापुरात झाला असल्याने चिंतेत भर पडली आहे.

कोरोना : सोलापुर जिल्ह्यातील सद्य परिस्थिती

१) होम क्वॉरंटाइन झालेल्या एकूण व्यक्ती :3217

२) होम क्वॉरंटाइन पूर्ण केलेल्या व्यक्ती : 1431 (14 दिवस कालावधी पूर्ण)

३) अद्याप होम क्वॉरंटाइनमध्ये असलेल्या : 1786 (हाताला शिक्के लावलेले)

४) इन्स्टिट्यूशनल क्वॉरंटाइन मध्ये1589
व्यक्ती होत्या. त्यापैकी 915 जणांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. तर व्यक्ती अद्यापही 674 इन्स्टिट्यूशनल क्वॉरंटाइन मध्ये असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

सोलापुरातील आयसोलेशन वॉर्डमध्ये 1129 रुग्ण, तपासणी पूर्ण केलेल्या 987 व्यक्ती यांचा तपासणी अहवाल मिळाला आहे.त्यापैकी 937 व्यक्ती निगेटिव्ह 50 व्यक्ती पॉझिटिव्ह
142 लोकांचे रिपोर्ट येणे बाकी. 9 नवीन रुग्णाची भर पडलेली आहेे.अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शनिवारी सायंकाळी दिली.

वरचेवर कोरोनाचा धोका वाढत असल्याचे चित्र सोलापूर शहरात दिसून येत आहे. आणि ही मोठी चिंतेची बाब आहे. प्रशासन मोठ्या प्रमाणावर प्रयत्नशील असले तरी नागरिकांच्या बेपर्वाईमुळे तसेच सुरक्षित अंतर नसल्यामुळे हा धोका वाढत आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur