सोलापूरातील कोरोना आता महापौर निवास, सोलापूर जेल मध्येही दाखल; दिवसात 4 मृत्यू
सोलापूर – (दि.3) सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आज सायंकाळी 7.30 च्या माहितीनुसार 1080 इतकी आहे.

आज एकूण 156 अहवाल प्राप्त झाले यात 116 निगेटिव्ह तर 40 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत.
मृतांची संख्या 4 नं वाढून 94 इतकी झाली आहे. तर रूग्णालयातून आजवर 469 जण बरे होवून घरी परतले आणि 517 जणांवर सध्या विविध रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
आत्तापर्यंत 8607 जणांची कोरोना चाचणी झाली असून 7860 अहवाल प्राप्त झाले आहेत तर 747 प्रलंबित आहेत. 6780 निगेटिव्ह तर 1080 पॉझिटिव्ह अहवाल आहेत.

आज मृत पावलेले 4 जणांची माहिती –
न्यू पाच्छा पेठ परिसर 68 वर्षीय पुरूष.
पाच्छा पेठ परिसरातील 60 वर्षीय महिला. पाच्छा परिसरातीलच 68 वर्षीय पुरूष.
तर पश्चिम मंगळवार पेठेतील 55 वर्षीय पुरूष.
आज जे रूग्ण मिळाले त्यात महापौर निवास 1 पुरूष, 1 महिला.
मरिआई चौक 1 पुरूष.
न्यू पाच्छा पेठ 1 पुरूष.
एनजी मिल चाळ 1 महिला.
धाकटा राजवाडा कौंतम चौक 1 महिला.


जोडभावी पेठ 1 पुरूष.
सोमवार पेठ 1 पुरूष.
मराठावस्ती भवानी पेठ 1 महिला.
लक्ष्मीविष्णू हौ.सोसा. कुमठा नाका 1 पुरूष.
कुमठा नाका 1 पुरूष.
भैय्या चौक 1 पुरूष.
मुकुंद नगर भवानी पेठ 1 पुरूष.
जय मल्हार चौक बुधवार पेठ 1 पुरूष.
जेल सोलापूर 26 पुरूष.