आज रात्री पर्यंत आयसोलेशन वार्ड मधे २३ सिरीयस रुग्ण होते. रात्री ११ च्या दरम्यान अजून २ सिरीयस रुग्णांना अॅडमिट करावे लागले. आपली २५ बेडची आय. सी. यु फुल्ल झाली आहे.

सिरीयस रुग्णांना अॅडमिट करून घेण्याची सिव्हिल हॉस्पिटलची क्षमता संपली आहे. रात्रीतून कोणी गोरगरीब रुग्ण आला तर कुठे ठेवायचे हा यक्ष प्रश्न आमच्यासमोर पडला आहे.
इतर वेळी ओढाचढीने रुग्णांना अॅडमिट करणार्या खाजगी रुग्णालयांनी या भीषण संकटात रुग्णालयाचे दरवाजे बंद ठेवले आहेत. मा. पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आयुक्त, उपायुक्त सर्व प्रकारे प्रयत्न करीत आहेत पण खाजगी रुग्णालये दाद देईनात.
आत्ताच मा. उपायुक्तांना फोन करून सांगितले आहे. उपायुक्तांनी तात्काळ चौकशी करून सांगतो असे सांगितले आहे. पण मला वाटत नाही की खाजगी रुग्णालये प्रतिसाद देतील म्हणून…


बंधूंनो, न जाणो आपल्यापैकी कुणाच्या जवळच्या व्यक्तीला आज आय. सी. यु. उपचाराची गरज भासली तर काय करायच? खरंच… आजपर्यंतच्या वैद्यकीय क्षेत्रातील आयुष्यात एवढी हतबलता कधीच आली नव्हती..
माझ्या पत्रकार बांधवांनो, सर्व काही आता तुमच्याच हातात आहे.
मी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती करतो की गोरगरीब रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी काही तरी करा… लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची ताकद काय असते हे दाखवून द्यायची यापेक्षा दुसरी कुठलीच संधी मिळणार नाही…

खाजगी रुग्णालये उघडायला भाग पाडा.. सर्व उपाय खुंटले आहेत. फक्त आणि फक्त तुमच्यावरच आता भरोसा आहे. सोलापूरचे गोरगरीब रुग्ण तुम्हाला आयुष्यभर दुवा देतील.
डॉ. औदुंबर मस्के
वैद्यकीय अधिक्षक