सोलापुरात रविवारी सकाळी ही आढळले 26 पॉझिटिव्ह रुग्ण; एकूण आकडा झाला 891

0
243

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात रात्रीत 26 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले असून सोलापुरातील कोरोनाबाधित व्यक्तींची एकूण संख्या 891 झाली आहे. शनिवारी सायंकाळी साडेसात ते रविवारी सकाळी आठ या साडेबारा तासात 13 पुरुष आणि 13 महिलांची भर पडली आहे. 

आज सकाळी आठ वाजेपर्यंत एका पुरूषाचा मृत्यू झाल्याने सोलापुरात कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींची संख्या 84 झाली आहे. कोरोना मुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या 380 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

आज सकाळी आठ वाजेपर्यंत कोरोना चाचणीचे 79 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 26 अहवाल पॉझिटिव्ह तर 53 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आत्तापर्यंत 7 हजार 115 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून सहा हजार 224 निगेटिव्ह आले आहेत. 891 पॉझिटिव्ह आले आहेत. 

सोलापूर आजचा अहवाल
दि.31/05/20 सकाळी 8.00
आजचे तपासणी अहवाल – 79
पॉझिटिव्ह- 26                                                                 (पु. 13 * स्त्रि- 13 )
निगेटिव्ह- 53
आजची मृत संख्या- 1  –    1पु
एकुण पॉझिटिव्ह- 891
एकुण निगेटिव्ह – 6224
एकुण चाचणी- 7115
एकुण मृत्यू- 84
एकुण बरे रूग्ण- 380

Best IT Comany In Maharashtra , Solapur