नवीन 13 रुग्ण आहेत ‘या’ परिसरातील ; 9 महिला तर 4 पुरुष…
सोलापूर शहर व जिल्ह्यात आज कोरोना बाधित रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिलेल्या अहवालावरून दिसून येत आहे.
सोलापुरात बुधवारी १३ कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये ९ महिला तर ४ पुरूष आहेत . पॉझीटीव्ह आढळलेले रुग्ण पाटकुलच्या महिलेवर उपचार करणाºया एका हॉस्पीटलमधील कर्मचारी आहेत. यामध्ये तीन नर्स, एक ब्रदर आणि एका सफाई कर्मचाºयाचा समावेश आहे. ती महिला २१ एप्रिल रोजी त्या रुग्णालयात उपचारासाठी आयसीओमध्ये दाखल झाली होती.
त्यानंतर तेथून डिस्चार्ज घेऊन पंढरपूरच्या रुग्णालात दाखल झाली होती. तिथे ती प्रसूत झाल्यावर त्रास होऊ लागल्याने शासकीय रुग्णालयात दाखल केल्यावर तिला सारीची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे तिची हिस्ट्री तपासण्यात आली होती. ती महिला सोलापुरातील दोन हॉस्पीटलमध्ये दाखल झाली होती. त्यानुसार संबंधीत हॉस्पीटलमधील चार डॉक्टर व ४0 कर्मचाºयांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तिच्या थेट संपर्कात आलेल्या नर्स, ब्रदर व सफाई कर्मचाºयास लागण झाल्याचे बुधवारी आलेल्या अहवालात स्पष्ट झाले आहे. हे कर्मचारी ताई चौक, शास्त्रीनगर, इंदिरानगर येथील रहिवाशी आहेत. या अनुषंगाने इतर दोन हॉस्पीटलमधील कर्मचाºयांचेही स्वॅब घेण्यात आलेले आहेत.

आजची बाधित ( पॉझिटिव्ह व्यक्तिंचे क्षेत्र/ वर्गवारी)
बुधवारी सदर बझार लष्कर तीन स्त्रियांची नोंद आहे, सिद्धार्थ हौसिंग सोसायटी मध्ये एक स्त्री ,आंबेडकर नगर ,माऊली चौक 1 महिला ,शामानगर ,बिग बाजार एक महिला, मार्कंडेय नगर,कुमठा नाका 1महिला बाधित आढळून आली .
इंदिरानगर तीन पुरुष शनिवार पेठ, पाच्छा पेठ जवळ 1पुरुष शास्त्रीनगर एक महिला तर ताई चौक ,MIDC रोड येथील 1 महिला असे 13 नव्याने रुग्ण मिळाले आहेत.
आजपर्यंत आयसोलेशन रुग्णांची संख्या 1624 असून प्राप्त तपासणी अहवाल 1250 आहेत प्रलंबित तपासणी अहवाल 374 तर निगेटिव्ह अहवाल 1169 आहेत, पॉझिटिव्ह अहवाल 81 आले आहेत या 81 रुग्णांपैकी सहा जणांचा मृत्यू झाला असून 75 रुग्णांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत .त्यामध्ये 43 वपुरुष व 32 स्त्रियांचा समावेश आहे,
सोलापूर शहरात सारी या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवावे .मास्कचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाने वेळोवेळी केलेले आहे.