सोलापुरात तिसऱ्या रुग्णाचा मृत्यू ; रुग्णांचा आकडा पोहचला तिसवर

0
248

सोलापूर: सोलापूर शहरात कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे आणखी एका ७५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हा व्यक्ती तेलंगी पाच्छा पेठेतील आहे. तेलंगी पाच्छा पेठेत कोरोनामुळे मरण पावलेली ही दुसरी व्यक्ती आहे. सोलापुरात मंगळवारी रात्री कोरोना विषाणूने बाधीत झालेले पाच नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सोलापुरातील एकूण रुग्णांची संख्या ३० झाली आहे. संचारबंदी लागू होऊन दोन दिवस झाले. सोलापुरातील रुग्णांची संख्या वाढत आहे.

या ज्येष्ठ व्यक्तीला १९ एप्रिल रोजी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सोमवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या स्वॅब चाचणीचा अहवाल मंगळवारी आला आहे. चाचणीचा रिपोर्ट आला नसल्याने प्रशासनाने त्यांना त्यांचा मृतदेह ताब्यात दिला नव्हता. पण आता ती प्रक्रिया सुरू होणार आहे. तेलंगी पाच्छा पेठेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. एका किराणा दुकानदाराचा मृत्यू झाला आहे. या परिसरात एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या महिलेला कोरोनाची लागण झाली असून या महिलेच्या संपर्कातील १२ जणांना कोरोना झाला आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

6 कंटेनमेंट झोन घोषित…

पाच्छा पेठ, रविवार पेठ ,इंदिरानगर, जगन्नाथ नगर,कुर्बान हुसेन नगर परिसर, बापुजी नगर परिसर कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहेत.या भागातील नागरिकांचं सर्वेक्षण करण्याचं काम सुरू आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur