सोलापुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्येने पार केली शंभरी.! 3 रुग्ण झाले बरे-पालकमंत्र्यांनी दिली माहिती

0
333

सोलापुरात 102 पेशंट पॉझिटिव्ह असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. आजपर्यंत सहा बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे हेही त्यांनी सांगितले. आजच्या आढावा बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. तीन पेशंटना आज निगेटिव्ह रिपोर्ट आल्याने डिस्चार्ज दिला असल्याचंही त्यांनी सांगितलं.

काल सोलापूर मध्ये 81 बाधित रुग्ण असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली होती. मात्र आज एकाच दिवसात 21 रुग्णांची भर पडली आहे. हे पालकमंत्र्यांच्या बोलण्यावरून दिसून येत आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

एकाच दिवशी तब्बल एकवीस रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी जिल्ह्यात एकूण आकडा ८१ होता. त्यात सहा रुग्ण मयत असल्याची नोंद असल्याची माहिती पालकमंत्री धरणे यांनी दिली. त्यासोबतच धरणे यांनी लोकांना घराबाहेर पडू नये अाणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी केले.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-

Best IT Comany In Maharashtra , Solapur