सोलापुरात कोरोना पॉझिटिव्ह ची संख्या तीन ने वाढली; संचारबंदी ची मुदत ही वाढवली

0
273

सोलापूर : सोलापुरात ‘कोरोना’ रुग्णांमध्ये वाढ होत चालली असून, बुधवारी आणखी तीन पॉझीटीव्ह रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिली.

नव्याने आढळलेले रुग्ण कुमठा नाका येथील भारतरत्न इंदिरा नगरातील दोन आहेत. येथील एका वृद्धेचा कोरोणामुळे मृत्यू झाला होता. त्या वृद्धेच्या संपर्काताील लोकांना ताब्यात घेऊन तपासणीसाठी नमुने घेतले असता दोघांचा अहवाल पॉझाीटीव्ह आला आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

त्याचबरोबर नईजिंदगी येथील शिवगंगानगरात राहणारी महिला आजाराने उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाली होती. तिचे नमुने प्रयोग शाळेत तपासले असता, ती कोरोणा पॉझीटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशाप्रकारे सोलापुरात आता कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या 33 झाली असून, यातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर ३0 जणांवर उपचार सुरू आहेत.

हॉटस्पॉट वाढत आहेत.

सोलापुरात कोरोणाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र दिसून आले आहे. आतापर्यंत नऊ हॉटस्पॉट झाले आहेत. यामध्ये मंगळवारी मोदीखाना, शास्त्रीनगर व मदरइंडिया झोपडपट्टी सील करण्यात आली. तेथील बाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांना तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

बुधवारी शिवगंगानगरातील महिला पॉझीटीव्ह आढळल्याने आता हा भाग देखील सील करण्यात आला आहे. सोलापुरात कोरणा रुग्णांची संख्या वाढत असल्याने संचारबंदीचा अंमल आणखीन कडक करण्यात येत आहे. लोकांनी कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले आहे.

संचारबंदी मुदत वाढवली सोलापुरात कोरोना पॉझिटिव्ह ची संख्या तीन ने वाढली; संचारबंदी ची मुदत ही वाढवली

सोलापूर शहरातील संचारबंदी आणखीन चार दिवसासाठी वाढवण्यात आली आहे या संचारबंदी ची मुदत आज रात्री बारा वाजता संपणार होती शहरात आज दुपारपर्यंत आणखीन चार नवे कोरोना चे बाधित रुग्ण सापडले आहेत रुग्णांची संख्या आता ते 33 वरून 37 इतकी झाली आहे ही माहिती आज दुपारी जिल्ह्याचे नवे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली

Best IT Comany In Maharashtra , Solapur