सोलापुरातील कोरोना बाधितांची संख्या आज 20 ने वाढून 216 झाली आहे.अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शनिवारी दिली. आज एकाच दिवशी बाधितांची संख्या 20 ने वाढल्याने सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे.
अशोक चौक परिसरात राहणाऱ्या एका ४८ वर्षीय महिलेचा कोरोना विषाणुमुळे आज मृत्यू झाला असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे. आतापर्यंत चौदा व्यक्तींचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. काही केल्या हा वेग थांबत नसल्याने पाहता पाहता आज २०० चा आकडा पार केलाय. त्यामुळे शहर जिल्हा हादरून गेला आहे.शनिवारी कोरोना बाधितांची संख्या आज 20 ने वाढून 216 झाली आहे.

काल शुक्रवारी रात्री पर्यंत सोलापुरातील बाधितांची संख्या 196 होती.अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली होती.त्यात 111 पुरुष तर 85 स्त्रियांचा समावेश होता.

शनिवारी अशोक चौक परिसरातील 48 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून 7 मे रोजी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 7 मे रोजी दुपारी निधन झाले. कोव्हीड 19 अहवाल आज मिळाला तो पॉझिटिव्ह निघाला.

प्रलंबित अहवाल 153
नवे रुग्ण
शास्त्री नगर 6
कुमठा नाका 2
नई जिंदगी 1
अशोक चौक 1
एकता नगर 2
नीलम नगर 2
केशव नगर 1
मनोरमा नगर,विजापूर रोड 1
सदर बझार 1
लष्कर कुंभार गल्ली 1
साईबाबा चौक 1
बापूजी नगर 1