सोलापुरात कोरोनाचा कहर सुरूच; आज 31 ची वाढ रुग्ण संख्या झाली 308

0
253

आजही 31 नं वाढला सोलापूरात कोरोनाचा कहर

सोलापूर- सोलापूरात कोरोनाबाधितांची संख्या आज 31 नं वाढून 308 इतकी झाली आहे. तर मृतांची संख्या आज 2 ने वाढून 21 वर पोहोचली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

आत्तापर्यंत 3502 जणांची कोरोना स्वॅब चाचणी घेण्यात आली. यापैकी 3360 अहवाल प्राप्त झाले. यात 3052 निगेटिव्ह तर 308 पॉझिटिव्ह आहेत.

आज एका दिवसात 129 अहवाल प्राप्त झाले यात 98 निगेटिव्ह तर 31 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. यात 15 पुरूष आणि 16 महिलांचा समावेश आहे.

आज मृत पावलेल्यांमध्ये 60 वर्षीय व्यक्ती गुरूनानक नगर परिसरातील पुरूष आहे. दि. 11 रोजी सायंकाळी या व्यक्तीचा मृत्यू झाला; तर दुसरी व्यक्ती इंदिरा वसाहत भवानी पेठ येथील 72 वर्षीय पुरूष आहे. या व्यक्तीचा मृत्यू 12 मे रोजी झाला.

आज मिळालेले रूग्ण साईबाबा चौक 2 पुरूष, 4 महिला.

लष्कर सदर बझार 1 पुरूष, 1 महिला,

शास्त्री नगर 2 पुरूष, 2 महिला.

नवनाथ नगर 1 महिला.

भारतरत्न इंदिरानगर 3 पुरूष, 4 महिला.

रामलिंग नगर 1 पुरूष.

कुमारस्वामी नगर 1महिला.

बेगमपेठ 1 पुरूष.

केशव नगर 1 पुरूष.

गवळी वस्ती जुना कुंभारी रोड 1 पुरूष.

जुळे सोलापूर 1 पुरूष.

एकता नगर 1 पुरूष.

इंदिरा वसाहत भवानी पेठ 1 पुरूष.

पोलीस मुख्यालय 1 महिला.

रंगभवन 1 महिला.

रविवार पेठ 1 महिला.

आत्तापर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या 308 मध्ये 173 पुरूष तर 135 महिलांचा समावेश आहे. तर मृत 21 पैकी 11 पुरूष आणि 10 महिलांचा समावेश आहे.
रूग्णालयातून बरे होवून गेलेल्यांची संख्या 84 असून यात 55 पुरूष तर 29 महिलांचा समावेश आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur