सोलापुरात आज एका दिवसात 7 नवे रुग्ण ; एकूण आकडा 135 वर

0
399

सोलापुरातील कोरोना बाधितांची संख्या आज 7 ने वाढून 135 झाली आहे.अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोमवारी दिली. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

सोलापुरात आत्तापर्यंत 2258 जणांची कोरोना स्वॅब चाचणी घेण्यात आली .यापैकी 2003 अहवाल प्राप्त झाले आहेत. यात 1868 निगेटिव्ह ,तर 135 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

जिल्हाधिकारी शंभरकर यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की,आज एका दिवसात सोलापुरात 116 चाचणी अहवाल आले यात 109 निगेटिव्ह तर 7 पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये पुरुष दोन स्त्री पाच असून एका स्त्रीचा मृत्यू झाला आहे.

आज या भागातील 7 रुग्ण आढळून आले आहेत.यात
नई जिंदगी मधील दोन स्त्री ,शास्त्रीनगर मधील एक स्त्री न्यू पाच्छा पेठ मधील एक स्त्री, तरी देगाव मधील एक पुरुषाचा तर भगतसिंग मार्केट समोरील गेंट्याल चौक येथील एका पुरूषाचा समावेश आहे त्याच सोबत जोडभावी पेठ मधील एका स्त्रीचा समावेश आजच्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये होतो

Best IT Comany In Maharashtra , Solapur