1144 कोरोनाबाधित तर 484 बरे झाले
सोलापूर- सोलापुरात आज एका दिवसात 353 अहवाल प्राप्त झाले यात 289 निगेटिव्ह तर 64 पॉझिटिव्ह अहवाल आहेत. यात 43 पुरूष, 21 महिलांचा समावेश आहे. आज 5 जणांच्या मृत्यूची नोंद आहे तर बरे झालेल्यांची संख्या 15 आहे.
आजवर कोरोना बाधितांची संख्या 1144 इतकी झाली असली तरी 484 जण आत्तापर्यंत बरे होवून घरी परतले आहेत तर 561 जणांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत 99 जणांचा कोरोनामुळे सोलापूरात मृत्यू झाला आहे.

एकूण 8765 जणांची चाचणी आजवर झाली असून 8213 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 7069 निगेटिव्ह, 1144 पॉझिटिव्ह अहवाल आहेत तर 549 अहवाल प्रलंबित आहेत.

आज जे मृत पावले त्यांची माहिती जुना विडी घरकुल परिसर 78 वर्षीय पुरूष. जोडभावी पेठ परिसर 59 वर्षीय पुरूष. न्यू बुधवार पेठ 54 वर्षीय पुरूष. एमआयडीसी रोड आशा नगर 69 वर्षीय पुरूष. मुरारजी पेठ 78 वर्षीय महिला.

आज जे पॉझिटिव्ह रूग्ण मिळाले ते विभाग पु ढीलप्रमाणे – नव कल्याण नगर रविवार पेठ 1 पुरूष, 1महिला. मुरारजी पेठ 1 महिला. जुना विडी घरकुल 1 पुरूष, 1 महिला. बुधवार पेठ 2 पुरूष. साखर पेठ 1 पुरूष. डफरन क्वार्टर 1 पुरूष, 1महिला. जोडभावी पेठ 1 पुरूष. भवानी पेठ 3 पुरूष, 3 महिला. बेघर सोसा. विजापूर रोड 1 पुरूष. विजापूर नाका 1 पुरूष. चंडकनगर आसरा 1 पुरुष. रेल्वे लाईन्स 1 पुरूष. विनायक नगर एमआयडीसी 1 पुरूष. संगमेश्वर नगर अ.कोट रोड 1 पुरूष.
यामिनी नगर विजापूर रोड 1 पुरूष. शुक्रवार पेठ 1 पुरूष. दाजी पेठ 1 महिला. भागवत टॉकिजजवळ 1 पुरूष. सदर बझार लष्कर 1 पुरूष. अ.कोट रोड 1 पुरूष. मार्केट यार्ड जवळ 1 पुरूष. आशानगर एमआयडीसी 1 पुरूष. कुमठा नाका 1 महिला. एकता नगर 1 महिला. निलम नगर 1 पुरूष. नागनाथ सोसा. एमआयडीसी 1 महिला. मोदीखाना 1 महिला. इंदिरा नगर विजापूर रोड 1 पुरूष. गुरूनानक चौक 1 पुरूष. स्वप्नपूर्ती सर्वोदय सोसा.

1 पुरूष. चंद्रोदय नगर कुंभारी 1 पुरूष, 1 महिला. विडी घरकुल कुंभारी 5 पुरूष. 3 महिला. नवीन विडी घरकुल कुंभारी 3 पुरूष, 5 महिला. उक्कडगांव बार्शी 1 पुरूष. जामगांव बार्शी 3 पुरूष. वाणी प्लॉट बार्शी 1 पुरूष. मुळेगांव पारधी वस्ती द. सोलापूर 1 पुरूष. अनिल नगर पंढरपूर 1 पुरूष.