सोलापुरातील साथ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण झाले बरे; हॉस्पिटल मधून दिला डिस्चार्ज

0
310

सुखद क्षण : ७ कोरोना फायटर्संना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

सोलापूरकरांसाठी एक गुड न्यूज समोर आली. आहे.आज 7 जणांचा कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट आला आहे.त्यामुळे या सातही जणांना घरी सोडण्यात आले आहे .विशेष म्हणजे कालच 3 कोरोना बाधित व्यक्ती या बऱ्या झाल्या होत्या.त्यामध्ये 2 पुरुष आणि 1 स्त्रीचा समावेश होता. आजपर्यंत एकूण दहा बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत अशी माहिती रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

यामध्ये पाच्छा पेठेतील 1 महिला आणि त्याच परिसरात राहणाऱ्या 6 पुरुषांचा समावेश आहे. अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक औदुंबर म्हस्के यांनी दिली.

होय आपण नक्कीच विजयी होऊ…

सर्व नागरिकांनी डॉक्टरांवर विश्वास ठेवावा.आपण लढावू वृत्तीने या आजाराशी लढत आहोत. यावर आपण नक्कीच विजय मिळवू. प्रशासनाने सांगितलेल्या सर्व सूचनांचे पालन करावे. आरोग्याची काळजी घ्यावी सोशल डिस्टन्स पाळावे. सर्व बाधित रुग्ण नक्कीच बरे होतील आणि आपण या विषयांवर नक्कीच विजय मिळवू असे सिव्हिल हॉस्पिटल चे अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर म्हणाले.

कोरोनाला हरवल्यामुळे हॉस्पिटल प्रशासनाकडून या सर्व कोरोना फायटर्सचे टाळ्या वाजवून, फुलांची उधळण करुन मनोबल वाढविण्यात आले. घरी परतत असताना सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता.

गेल्या काही दिवासांपासून कोरोनाशी झुंज देणारे १ महिला व ६ पुरुष असे एकूण ७ कोरोना फायटर अखेर सुदृढ होऊन सहीसलामत रुग्णालयातून बाहेर पडले.

हे रुग्ण पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्याने कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्यावर १६ एप्रिलपासून जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर आता त्याचे दोन्ही कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने त्यांना होम क्वारंटाइनचा शिक्का मारून घरी सोडण्यात आले आहे.

कोरोना बाधितांनी शंभरी पार केलेल्या सोलापूर जिल्ह्यात कोरोनाने वाढते संक्रमण हा चिंतेचा विषय बनला अाहे. मात्र गेल्या २ दिवसांपासून रुग्ण अाता बरे होऊन घरी परतत असल्याने थोडासा दिलासादेखील मिळत अाहे. बुधवारी पाच्छा पेठेतील तीन कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाचे १४ दिवसांनंतरचे दोन्ही नमुने निगेटीव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यात आई आणि तिच्या दोन मुलांचा समावेश होता.

त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरु होते. उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि टीमचे सर्वांनी धन्यवाद मानले. दरम्यान सध्या सोलापुरातील कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आता १० वर गेली आहे. विशेष म्हणजे गेल्या ४८ तासात कोरोनाने एकाचाही मृत्यू झाला नाही.

कोरोना मुक्त रुग्णांची गळाभेट टाळा

महाराष्ट्रात कोरोनामुक्त रुग्ण घरी पोहोचल्यानंतर सोशल डिस्टसिंगचे सर्व नियम अक्षरश: पायदळी तुडवण्यात आल्याची उदाहरणे समोर आली आहेत. हा रुग्ण रूग्णालयातून घरी आल्यानंतर अनेक उपस्थितांनी त्या रूग्णासोबत हस्तांदोलन करतात. त्यांची गळाभेट घेतात. कोरोना रुग्ण बरा होऊन आल्यानंतर गळाभेट टाळण्याचं सांगितलं आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur