सोलापुरातील कोरोना ग्रस्तांची वाढ सुरूच;आज 3 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह ; एकूण 114

0
333

सोलापूर: सोलापूर शहरात आज 32 जणांचे वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 29 अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.तर 3 जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आलेले आहेत. ज्यामध्ये तीन पुरुष रुग्णांचा समावेश आहे.अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.

आज दिवसभरात एकूण ३२ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी २९ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले तर तीन जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. आज केगाव येथून ४४ जणांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनमधून सोडून देण्यात आले आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सध्या आयसोलेशनमध्ये असलेल्यांची संख्या १९७३ असून त्यापैकी १६७४ जणांचा अहवाल प्राप्त झ‍ाला तर १५६० जणांचा अहवाल निगेटिव्ह अाला. अजून २९९ जणांच‍ा अहवाल प्रलंबित असून आतापर्यंत ११४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात सहा मृतांचा समावेश आहे मृतांपैकी तीन पुरुष अाणि तीन महिला आहेत. तर सक्रिय रुग्णांची संख्या ९८ असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली

ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती

• घेरडी ता. सांगोला येथील पॉझिटिव्ह रुग्णांच्या 19 High Risk संपर्कात असलेल्या लोकांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून सर्व अहवाल निगेटिव्ह असून या सर्वाना Institutional Quarantine मध्ये दाखल केलेले आहेत. तसेच Low Risk 18 सहवासित Home Quarantine मध्ये ठेवलेले आहेत.

पेनूर ता. मोहोळ येथील पॉझिटिव्ह रुग्णांच्या 64 High Risk (16 मोहोळ व 48 पंढरपूर तालुक्यातील) सहवासितांचे घशातील स्त्रावांचे नमुने तपासण्यात आले असून सर्व अहवाल
निगेटिव्ह असून या सर्वाना Institutional Quarantine मध्ये दाखल केलेले आहेत. तसेच Low Risk 14 सहवासित Home Quarantine मध्ये ठेवलेले आहेत.

चपळगांव ता. अक्कलकोट येथील पॉझिटिव्ह रुग्णांच्या 78 सहवासितांचे घशातील स्त्राव तपासण्यात आले असून सर्व अहवाल निगेटिव्ह असून या सर्वाना Institutional Quarantine मध्ये दाखल केलेले आहेत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur