सोलापुरातील कोरोनाचा आकडा झाला 65 आज ‘चार’ नवीन रुग्ण वाढले;एक नगरसेवक ही पॉझिटिव्ह

0
318

सोलापुरातील कोरोनाचा आकडा झाला 65 आज ‘चार’ नवीन रुग्ण वाढले;एक नगरसेवक ही पॉझिटिव्ह

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यात रविवारी कोरोना बाधित संख्या 61 होती आज त्यामध्ये 4 ची भर पडली आहे. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 65 झाली आहे.त्यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला आहे.उर्वरित 60 जणांवर उपचार सुरू आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

आज ज्यांचे पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाले आहेत त्यापैकी एक व्यक्ती न्यू तिर्हेगाव फॉरेस्ट चांदणी चौक परिसरातील, दुसरी व्यक्ती सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील आहे. तर दोन व्यक्ती शास्त्रीनगर परिसरातील असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे

सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत 65 व्यक्ती बाधित आढळून आले आहेत त्यापैकी पाच व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे .60 व्यक्ती सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत .आज एकूण 23 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 19 अहवाल हे निगेटिव्ह आढळून आले तर चार व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले.

आज पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या पैकी तीन पुरुष असून एक महिला आहे.

कोरोना : सोलापुरातील आजच्या संध्याकाळ पर्यंतची माहिती

१) होम क्वॉरंटाइन झालेल्या एकूण व्यक्ती : 3729

२) होम क्वॉरंटाइन पूर्ण केलेल्या व्यक्ती : 1558 (14 दिवस कालावधी पूर्ण)

३) अद्याप होम क्वॉरंटाइनमध्ये असलेल्या : 2171 (हाताला शिक्के लावलेले)

४) इन्स्टिट्यूशनल क्वॉरंटाइन मध्ये
1675 व्यक्ती होत्या. त्यापैकी 935 जणांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. तर 740 व्यक्ती अद्यापही इन्स्टिट्यूशनल क्वॉरंटाइन मध्ये असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

सोलापुरातील आयसोलेशन वॉर्डमध्ये 1280 रुग्ण, तपासणी पूर्ण केलेल्या 1075 व्यक्ती यांचा तपासणी अहवाल मिळाला आहे.त्यापैकी 1010 व्यक्ती निगेटिव्ह 65 व्यक्ती पॉझिटिव्ह.
205 लोकांचे रिपोर्ट येणे बाकी आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोमवारी सायंकाळी दिली.

पाटकुल येथील महिला पंढरपुरातील एका खाजगी रुग्णालयात बाळंत झाली. त्यानंतर तिचा अहवाल पॉझीटीव्ह आल्याने त्या खाजगी रुग्णालयातील दोन डॉक्टरांसह १४ जणांना तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी दिली. या सर्वांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur