सोजर कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये राज्यस्तरीय पोस्टर सादरीकरण स्पर्धा संपन्न

  0
  288

  सोजर कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये राज्यस्तरीय पोस्टर सादरीकरण स्पर्धा संपन्न

  बार्शी : येथील यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सोजर कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये आयोजित पोस्टर सादरीकरण  स्पर्धेमध्ये 22 फार्मसी कॉलेजमधून 216 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

  आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

  या कार्यक्रमाचा शुभारंभ यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण दादा बारबोले व उस्मानाबाद चे माजी शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल खोचरे यांच्या हस्ते करण्यात आला.

  यावेळी डॉ. प्रवीण जावळे , प्रा. सुरवसे सर, प्रा. काळे आणि सोजर कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य रवींद्र बेंदगुडे व हेड ऑफ द डिपार्टमेंट सुजित करपे उपस्थित होते.

  या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या कॉलेजमधून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी नॉवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम, रिस्पॉन्सिबल युज ऑफ अँटिबायोटिक, ऑनलाइन फार्मसी, इनोव्हेटिव्ह मेडिकल डिव्हाइसेस, हर्बल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम अशा विविध आधुनिक औषधनिर्माणशास्त्र विषयावर पोस्टर सादर केले.

  सदर स्पर्धेमध्ये बी फार्मसी विभागातून के.टी. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी उस्मानाबाद मधील शोएब बागवान व शिशिर बडवे तसेच माणदेश इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी म्हसवड जिल्हा सातारा मधील अक्षता खटके व जागृती बिदग यांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला. तसेच संयुक्तपणे द्वितीय क्रमांक सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी मधील संध्याराणी गजरे व के.टी. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी मधील घुगे सौरभ व भाटे दीपक यांनी मिळवला.

  डी फार्मसी विभागातून कॉलेज ऑफ फार्मसी सोलापूर मधील पल्लवी कवडे व स्वाती सुळे आणि केशवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी मधील स्नेहल माने व गजानन  देशमाने यांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक मिळवला. तसेच संयुक्तपणे द्वितीय क्रमांक सोजर कॉलेज ऑफ फार्मसी खांडवी मधील गौरी कांबळे व भानुशाली हिरल आणि श्री गणपती इन्स्टिट्यूट ऑफ डी फार्मसी टेंभुर्णी मधील विनायक गडदे व गणेश कदम यांनी मिळवला.

   अनिल खोचरे  म्हणाले की विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना स्वतःच्या सर्वांगीण विकास करण्यावर भर द्यावा. जावळे सर, काळे सर, सुरवसे सर यांनी परीक्षक म्हणून सहकार्य केले.  सूत्रसंचालन प्राध्यापक जाडकर सर व प्राध्यापक दगडे मॅडम यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. सुजित करपे सर यांनी केले.

  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा मोकाशी सर, प्रा शेळके सर, प्रा व्यवहारे मॅडम, प्रा मुंडे मॅडम, प्रा जाधव मॅडम, प्रा विधाते मॅडम व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

  Best IT Comany In Maharashtra , Solapur