सुलाखे इंग्लिश मिडीयम प्रिप्रायमरी स्कूल समूह नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक

    0
    252

    सुलाखे इंग्लिश मिडीयम प्रिप्रायमरी स्कूल समूह नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक

    बार्शी :

    आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

    श्रीमती प्रयाग कराड विश्वशांती इंग्लिश मिडीयम स्कूल तसेच शिशू संस्कार केंद्र, बार्शी तर्फे आयोजित समूह नृत्य स्पर्धेत सुलाखे इंग्लिश प्रिप्रायमरी स्कूलच्या सिनिअर केजीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रथम क्रमांक पटकाविला.

    श्रेयष नष्टे,श्रवण कांबळे,पृथ्वीराज माने,कृष्णा चौधरी,शिवरुद्र बनशेट्टी,मिहित बुवा,सानवी लाडे, स्वराली भड,चेतना सोलंकी,सोफिया बागवान,दीप्ती मांगडे,जान्हवी आगलावे ह्या सहभागी विद्यार्थी व विद्यार्थिनी ने अतिशय उत्कृष्ट देशभक्तीपर गीतावर समूह नृत्य सादर केले. त्यांनी या गीतामधून पुलवामाच्या हल्ल्यातील सर्व शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.त्याचबरोबर स्वातंत्र्य सैनिकांचे ही स्मरण केले तसेच आधुनिक भारताचे रूपही सादर केले.या विद्यार्थ्यांना सौ. शाहीन शेख,सौ. सुवर्णा सोपल,सौ.अर्चना घोलप यांचे मार्गदर्शन लाभले.

    सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे बार्शी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्री. आनंद सुलाखे,सचिव श्री.अनंत कवठाळे,संचालक श्री. स्वामीराव हिरोलीकर,श्री. प्रसन्न देशपांडे,प्रशासन अधिकारी श्री.श्रीपाद मंगोलिकर,प्रायमरी स्कूलचे प्र. मुख्याध्यापक श्री. उमेश चव्हाण व प्रि प्रायमरीच्या मुख्याधिपिका सौ. माया बेताळे यांनी अभिनंदन केले.

    Best IT Comany In Maharashtra , Solapur