सुखद वार्ता: बार्शी तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी 9 अहवाल  निगेटिव्ह, 19 अहवाल प्रलंबित

0
300

सुखद वार्ता: बार्शी तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी 9 अहवाल  निगेटिव्ह, 19 अहवाल प्रलंबित

बार्शी: सोलापूर जिल्हा प्रशासनाने मंगळवारी जाहीर केलेल्या अहवालात बार्शी तालुक्यातील  रातंजन येथील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील सात जणांचे तर बार्शी शहरातील दोन असे नऊ अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. सध्या नऊ पॉझिटिव्ह रुग्णावर कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत. अद्याप 19 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. यामध्ये आज नव्याने तपासणीसाठी सोलापूर ला पाठवलेल्या 10 स्वॅब चा समावेश आहे. अशी माहीत तालुका आरोग्य अधिकारी डॉ संतोष जोगदंड यांनी दिली.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

बार्शी तालुक्यात सध्या 260 जण संस्थात्मक कवारन्ताईन केले आहेत.तर होम कवारन्ताईन कुटुंबाचा आकडा 2435 एवढा आहे.आजवर तालुक्यातील 108 जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 86 जणांचे अहवाल आले आहेत. यातील 74 जणांचे अहवाल हे निगेटिव्ह तर 12 जणांचे पॉझिटिव्ह आले आहेत. या बारा मधील वैराग येथील एक रुग्ण बरा होऊन घरी गेला आहे.तर जामगावचा रुग्ण हा मृत्यू पावला आहे.

हे 19 अहवाल प्रलंबित

मंगळवारी रात्री प्रलंबित असलेल्या 19 अहवालात जामगाव प्रलंबित तीन आणि आज नव्याने पाठवलेले तीन असे 6 , बार्शी-2 ,शेंद्री – 1 ,रातंजन- 1 , तावरवाडी आणि वैराग येथील एक तर आज उककडगाव येथील 7 जणांचे ही नव्याने स्वॅब घेतले आहेत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur