सीएम उद्धव ठाकरे यांच्या विधनपरिषदेवरील नियुक्ती बाबत मंत्रिमंडळात पुन्हा ठराव
ग्लोबल न्यूज : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राज्यपालांच्या कोट्यातून विधपरिषदेवर आमदार म्हणून जाण्याचा तिढा आता सुटण्याच्या मार्गावर असलेला दिसून येत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधानपरिषदेवर नियुक्ती करणेबाबत ठराव मंजूर झाला होता. मात्र, उपमुख्यमंत्रीपद हे वैधानिक पद नसल्याचे कारण पुढे करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हा ठराव केंद्राच्या बाजूने सरकावला होता.
यावरुन केंद्र आणि राज्य सरकारमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नियुक्ती बाबत तणाव निर्माण झाला होता. मात्र, आज संध्याकाळी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर मार्ग निघेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

आजची बैठकही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच अध्यक्षतेखाली होईल. परंतु, यावेळी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यासाठी अधिकृत पत्र देखील देतील.
मंत्रिमंडळाची बैठक कोणाच्या अध्यक्षतेखाली घ्यायची, हे ठरवण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्याबाबत मंजूर केल्या जाणार्या प्रस्तावाला आक्षेप घेता येणार नाही.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीदेखील उद्धव ठाकरेंच्या नियुक्तीसाठी कॅबिनेट नोट आणून प्रस्ताव द्या, असा पर्याय महाविकास आघाडीला सुचवला होता. परिणामी उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीचा मार्ग मोकळा होईल.