सिल्व्हर ज्युबिली च्या विद्यार्थ्यांनी केली स्मशानभूमीची स्वच्छता, गोळा केला सहा पोती कचरा

बार्शी : केएलई सोसायटीच्या सिल्व्हर ज्युबिली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आज शहरातील स्मशानभूमीत (मोक्षधाम) स्वछता मोहीम राबवून कचरा गोळा केला. तत्पूर्वी यावेळी पूलवामा हल्यातील शहीदाना श्रद्धांजली वाहून अभियानाला सुरुवात करण्यात आली.
स्मशानभूमीत स्वच्छता अभियानातुन तब्बल सहा पोती केरकचरा, प्लास्टिक कचरा झाडुन व वेचून काढला आहे. अत्यंत स्वच्छ सुंदर, भरपूर झाडी बसायला उत्तम व्यवस्था. सर्व काही पाहिल्यावर आपण स्मशानात आल्याचे भास देखील होत नाही.


आजूबाजूचा रमणीय निसर्ग, स्वच्छता पाहून क्षणभर दुःख बाजूला सारण्याचा अनुभव येथिल मोक्षधाम स्मशानात आल्यावर प्रत्येकाला वाटतो. स्वच्छ पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था, बोलक्या भिंती, जीवनाला अर्थ देणारे संदेश, शिवाय आधुनिक व पर्यावरण पूरक दहन यंत्र, स्मशान सुध्दा पंचतारांकित असू शकतो याचे एकमेव उदाहरण बार्शीतील मोक्षधाम होय.

आधुनिक स्मशानभूमी साकारण्याचे श्रेय जाते अर्थातच मानाचा प्रसन्नदाता गणपती ट्रस्टला शाळेत शिकवताना बऱ्याचवेळा विद्यार्थ्यांना स्मशानभूमी बद्दल अनेक गैरसमज, अंधश्रद्धा, अज्ञान आणि लहान मुलांना घेऊन जाणे टाळतात. त्यामुळे स्मशान म्हटले की नेहमी विद्यार्थी कूतूहूल जागे करतात,
आणि त्याचाच एक भाग म्हणून हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रशांत कोल्हे यांच्या कल्पनेतुन आज विद्यार्थ्यांची मोक्षधाम स्मशानभूमी भेट घडवून आणली. यावेळी सर्व शिक्षक स्टाफ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
