सिने अभिनेता इरफान खान यांचे उपचारादरम्यान दुःखद निधन.

0
189

सिने अभिनेता इरफान खान यांचे उपचारादरम्यान दुःखद निधन
आपल्या अभिनयाने साऱ्या विश्वाला भुरळ घालणारे व अभिनयाची छाप साता समुद्रापार फडकविणारे अभिनेता इरफान खान यांनी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा स्वास घेतला आहे. वयाच्या 54 व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. अचानक तब्येत बिघडल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. इरफान खान यांना न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरचा आजार होता.


इरफान खान यांनी लंडनमध्ये कॅन्सरवर यशस्वी उपचार घेतले होते. त्यानंतर भारतात परल्यावर त्यांची प्रकृती अचानक खालावली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मृत्यूने सिने जगताचे मोठे नुकसान झाले आहे असे मत सिने विश्वातील मान्यवरांनी मांडले आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

Best IT Comany In Maharashtra , Solapur