सिद्धीविनायक मंदिर न्यास उचलणार शाहिद जवानांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च….!
जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा परिसरात दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण आलं होतं. पुलवामा परिसरात बंडजू येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील पानगाव येथील सीआरपीएफचे जवान सुनील काळे हे शहीद झाले होते. दरम्यान, त्यांच्या मुलाच्या पुढील शिक्षणाचा संपूर्ण खर्च मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट उचलणार आहे. या बाबतची माहिती सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिलेली आहे.


जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे एका दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीदरम्यान १८२ व्या बटालियन सीआरपीएफच्या हेड कॉन्स्टेबल सुनील काळे यांना हौतात्म्य आलं होतं. दरम्यान, त्यांच्या मुलाच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च श्री सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट उचलणार आहे. सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टकडून याबाबत माहिती देण्यात आली.

२३ जून रोजी पहाटे लष्कर, सीआरपीएफ आणि स्थानिक पोलीस यांच्या संयुक्त मोहिमेत पुलवामा भागात लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जात असताना तेथील बंडजू येथे दहशतवाद्यांशी चकमक उडाली. यात सीआरपीएफ जवान सुनील काळे यांना वीरमरण आले. काळे हे सोलापूर जिल्ह्यातील पानगाव (ता. बार्शी) येथील मूळ राहणारे होते.